शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सावधान, भंडारा शहरात पाण्याची पातळी खालावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:53 IST

शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देउपाय योजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष । जलपुनर्रभरणावर लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. ऐकेकाळी भंडारा जिल्ह्यात १५ हजारांपेक्षा जास्त तलाव व बोड्यांची संख्या होती. मात्र आज घडीला भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तीन हजार ५०० पेक्षा अधिक तलाव व बोडी आहेत. त्यातही अतिक्रमण,निधीचा वानवा व अन्य स्थानिक समस्या भर घालून आहेत. भंडारा शहरातील खामतलाव या तलावाची स्थितीही फारशी चांगली नाही. एकेकाळी पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेला खामतलावही समस्येच्या गर्तेत सापडला आहे. या तलावात पाणी साठा असल्याने परिसरातील भागातही जलसाठा विपूल प्रमाणात राहायचा. मात्र कालांतराने तलावाची खोलीकरण व अन्य बाबींमुळे पाणीसाठा कमी झाला आहे. तर दुसरीकडे भूगर्भाची पातळीही खालावल्याने परिसरातील विहिरी विंधन विहिरी व बोअरवेलची पातळीही खाली गेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यासह ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी चिंतेत राहावे लागत आहे. ८०-९० फुटांवर पाणी लागत असल्याने नागरिक बोअरवेल कमी खोदायचे. मात्र विद्यमान स्थितीत अडीचशे ते तीनशे फुट बोअर करावी लागत आहे. असाच प्रत्यय भंडारा शहरातील अन्य भागांमध्येही दिसू लागला आहे.पाण्याची पातळी खालावत असल्याने पाण्याच्या बाबतीत भंडारा शहरातील भविष्य संकटमय दिसत आहे. परिणामी आजपासूनच यावर कायमस्वरुपी तोडगा काढून जलपुनर्भरणावर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरच भविष्यकालीन पिढीला त्याचा उपयोग होऊ शकेल. नदीत पाणी व गावात बोंब अशी विचित्र स्थिती होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात