शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

लघुपाटबंधारे उपविभागाला हिरव्या कंदिलाची प्रतीक्षाच

By admin | Updated: April 23, 2016 00:39 IST

राजीव सागर बावनथडी प्रकल्पाला प्रधानमंत्री सिंचन योजनेत जरी समावेश केला गेला असला तरी मात्र तालुक्यात ...

दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींने लक्ष देण्याची गरजराहुल भुतांगे  तुमसरराजीव सागर बावनथडी प्रकल्पाला प्रधानमंत्री सिंचन योजनेत जरी समावेश केला गेला असला तरी मात्र तालुक्यात मंजुर असलेला लघु पाटबंधारेचा उपविभागाला अजुनपर्यंत हिरवा कंदिल मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे लांबणार असून लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरज आहे.तुमसर तालुक्यात मालगुजारी तलावांची संख्या लक्षात घेता त्या तलावांची देखभाल दुरूस्ती तसेच पाण्याच्या विनियोग कोल्हापूरी बंधारे, राष्ट्रीय रोजगार हमीची अनेक तांत्रिक कामे, पाण्याचा स्त्रोत वाढविण्याचे कार्य आदी कामे या विभागामार्फत होतात. जीवनदायी बावनथडी प्रकल्पाला यावर्षी प्रधानमंत्री सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यात आल्याची माहिती खा. नाना पटोले यांनी दिली व लवकरच म्हणजे मार्च २०१७ पर्यंत बावनथडीचे कार्य पूर्ण होणार असल्याचे सांगितले. बावनथडीचे आतापर्यंत बावन किस्ते सांगण्यात आले. मात्र अजूनपर्यंत बावनथडीचे पूर्ण झालेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आताही मालगुजारी, खाजगी व पाटबंधारे विभागाच्या तलावावरच अवलंबून राहावे लागत आहे. हे त्रिकालवादी सत्य असल्यामुळेच सन २०११ मध्ये ग्रामविकास मंत्रालयातर्फे नंदुरबार तसेच परभणी जिल्ह्यातील तालुक्यात लघुपाटबंधारेचा उपविभाग व भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथेही उपविभाग मंजुर करण्यात आले असता त्यावेळी नंदुरबार व परभणी जिल्ह्यातील तालुक्यात उपविभाग सुरूही करण्यात आले. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक आणि जिल्ह्यात मंजुर असलेल्या तालुक्यात ५ वर्षे लोटली तरी अजुनपर्यंत कार्यालय सुरूच झाले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी तात्काळ सेवा तर सोडाच कित्येकदा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाचे हेलपाटे खावूनही अधिकारी व अभियंते जागेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागते. परिणामी शेतकऱ्यांना शारीरिक, मानसिक त्रासह आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. जिल्ह्यात ही कार्यालये नव्याने उघडली गेली तर होवू घातलेल्या एमपीएससी मार्फत विदर्भाचे डेप्टी इंजिनिअर्स तालुक्याला मिळाले असते.