शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल गावांसाठी बसगाड्यांची प्रतीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:59 IST

प्रवाशांना फटका : रविवारी एक तास उशिरा सोडली बस, प्रवाशांना सहन करावी लागली गैरसोय

मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचे आहे. परंतु, तुमसर येथे मुख्य मार्गावर नियमित व वेळेवर बसगाड्या सोडण्यात येतात. परंतु, आदिवासीबहुल गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसगाडीची प्रतीक्षा करावी लागते. रविवारी लेंडेझरीकडे जाणारी बसगाडी सुमारे एक तास उशिरा सोडण्यात आली. तुमसर बसस्थानकात यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.

मागील दिवाळीपासून हे खोदकाम तसेच आहे. कासवगतीने सुरू असलेल्या कामांचा फटका प्रवाशांना बसत आहे. या आगारातून शहराकडे बसगाड्या सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. रविवारी या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होते. आदिवासी परिसरात जाणाऱ्या लेंडेझरी मार्गावरील मोठ्या प्रमाणात प्रवासी बसस्थानकात बसगाडीची प्रतीक्षा करीत होते. दुपारी एक वाजता ही बसगाडी सुटायला पाहिजे होती, ती एक तास उशिरा म्हणजे दुपारी दोन वाजता सोडण्यात आली.

विकासकामे संथगतीने तुमसर बसस्थानकात दर्शनी भागात खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. येथे विकासकामे सुरू आहेत. दिवाळीपूर्वी हे खोदकाम करून ठेवण्यात आले होते. परंतु, अजूनपर्यंत ते पूर्ण झाले नाही. मोठ्या संख्येने प्रवासी हे लहानशा जागेमध्ये बसगाड्यांची प्रतीक्षा करीत असतात. विकासकामे का रखडली अथवा कामे संथगतीने येथे का सुरू आहेत.

करण्यात येतो दुजाभाव ! शहराकडे धावणाऱ्या नियमित बसगाड्या येथे सोडण्यात येतात. परंतु, आदिवासीबहुल गावाकडे मात्र उशिरा बसगाड्या सोडण्यात येतात. शहर व ग्रामीण असा दुजाभाव येथे करण्यात येतो, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी लावला आहे. प्रवासी मुख्य मार्गावर उतरून जंगल मार्गाने गावाकडे प्रस्थान करतात. वन्यप्राण्यांच्या धोका येथे अधिक असल्याने बसगाड्या वेळेवर सोडण्याची गरज आहे. 

मार्गांवर पर्याप्त बस सोडण्याची मागणी 

  • तुमसर तालुक्यातील लेंडेझरी परिसर आदिवासी बहूल आहे. 
  • जंगलव्याप्त भागात तुमसर आगारातून सुटणाऱ्या बसेसचे प्रमाणात अत्यल्प आहे. 
  • प्रवासी व शाळकरी विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय.

"रविवारी ही बस सुमारे एक तास उशिरा सोडण्यात आली. उलट शहराकडे वेळेत बसगाड्या सोडण्यात येत होत्या. स्थानिक एसटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितल्यानंतर दुपारी एक तास म्हणजेच दोन वाजता लेंडेझरी ही बस सोडण्यात आली. त्याचा फटका मलासुद्धा बसला."- अशोक उईके, माजी जिल्हा परिषद सदस्य, तुमसर

टॅग्स :bhandara-acभंडारा