शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सात दशकानंतरही डांबरीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:00 IST

गाव तिथे रस्ता व रस्ते हे विकासाचे प्रमुख केंद्रबिंदू मानले जाते. रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जातो. परंतु तुमसर तालुक्यातील सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्ता पंधरा वर्षापूर्वी खडीकरण केला होता.

ठळक मुद्देसिलेगाव-कर्कापूर, परसवाडा रस्त्याची व्यथा : वाहनी-परसवाडा मार्गावरील रहदारी धोकादायक

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गाव तिथे रस्ता व रस्ते हे विकासाचे प्रमुख केंद्रबिंदू मानले जाते. रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जातो. परंतु तुमसर तालुक्यातील सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्ता पंधरा वर्षापूर्वी खडीकरण केला होता. सध्या रस्त्यावर खडीकरणाचे दगड बाहेर आले आहेत. दुसरा सिहोरा - सिलेगाव - वाहनी - परसवाडा रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे.स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही डांबरीकरणाचा पक्का रस्ता सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्ता तयार करण्यात आला नाही. १५ वर्षापूर्वी खडीकरण करण्यात आले होते. खडीकरण केलेल्या रस्त्याचे दगड सध्या बाहेर निघाले आहेत. रस्त्याची दूरवस्था झाली आहे. सदर रस्त्यावर एक मोठा नाला पडतो. पावसाळ्यात नाल्यावर पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटतो. येथे पुन्हा मोठा पुल तयार करण्याची गरज आहे.सिलेगाव - कर्कापूर रस्त्यावर नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात आहे. सायकल, दुचाकी, ट्रॅक्टर या मार्गाने मार्गक्रमण करतात. दगड बाहेर आल्याने अपघाताची भीती सदैव राहते. पावसाळ्यात रस्ता निमूळता होतो. अनेकदा येथे अपघात झाले आहे. १५ वर्षापूर्वी कच्चा रस्ता तयार करण्यात आला. संबंधित विभागाने मंजुरी दिली. त्यानंतर रस्त्याचा विसर पडला. विकासात्मक कामांची चर्चा करणाऱ्या पदाधिकारी यांचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.सिहोरा - सिलेगाव - वाहनी - परसवाडा रस्त्यावर मोठी वाहतूक राहते. तिरोडा - सिहोरा अशी बस या मार्गावर धावते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दुचाकी, सायकलस्वार, शाळेतील विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होत असून अपघाताची शक्यता बळावली आहे.सिहोरा येथे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे सदर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. अनेक महिन्यापासून येथे डांबरीकरणाची मागणी आहे. परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. डांबरीकरण उखडलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्त्यावर नेमके डांबर ओतल्याप्रमाणे येथे दिसत आहे. खड्डेमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेचा येथे विसर पडलेला दिसत आहे.सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्त्याचे दगड बाहेर आले असून तो धोकादायक बनला आहे. सिहोरा - सिलेगाव - वाहनी - परसवाडा रस्त्याला डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. येथे प्रशासन अपघाताची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसते. शासन व प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य, तुमसर.