शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेला पूर, नदीपात्रातील मंदिरात अडकलेल्या पाच भाविकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:22 IST

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातील बचाव पथकाने तब्बल तीन तास रेस्क्यू राबवून ही मोहीम फत्ते केली

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या अगदी मधोमध पात्रात असलेल्या नृसिंह मंदिरात पुरामुळे अडकलेल्या पाच भाविकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातील बचाव पथकाने तब्बल तीन तास रेस्क्यू राबवून ही मोहीम फत्ते केली.

मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या अगदी मधोमध पात्रात नृसिंह मंदिर आहे. सकाळी या नदीच्या पात्रातील पाणी अचानक वाढायला लागले यामुळे, मंदिरातील पुजारी मनोहर नींबार्ते (६१) आणि भाविक मनोहर खुरगेकर (६१), कल्पना खुरगेकर (४८), गिरीधर वाघाडे (४५), वैशाली चौधरी (३५) हे पाच व्यक्ती मंदिरातच अडकून पडले. मंदिर नदीच्या अगदी पात्रात असले तरी उंचावर असल्याने त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही मात्र पूर वाढल्यावर त्यांना धोका होता. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही बाब जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविल्यावर तातडीने त्यांच्या बचावासाठी हालचाली करण्यात आल्या. त्यांच्या शोधासाठी आणि बचावासाठी रबरीबोटीसह पथक पाठविण्यात आले.

मंदिरात हे व्यक्ती अडकले असल्याचे लक्षात येताच शोध व बचाव दलाला घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यानंतर रबरी बोटीमध्ये बसवून या सर्वांना सुखरूप पणे काठावर आणण्यात आले. पूर वाढत असल्यामुळे पाण्याला वेग होता. तरीही बचाव दलाच्या पथकाने जोखीम पत्करून त्यांना सुखरूप काठावर आणले. तुमसरच्या उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे सीताराम कोल्हे,अमरसिंह रंगारी, अशोक देवगडे, कुंभलकर आदींनी ही मोहीम पार पाडली.

टॅग्स :floodपूरbhandara-acभंडारा