शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तई येथे काळ्या फिती लावून तरूणांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:41 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. काही गावांमध्ये मतदानच झाले नाही. यात साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यातील तई (बुज), मुरमाडी, पारडी, घोडेझरी या गावांमध्ये बुधवारला फेरमतदान घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देअटक व सुटका : बॅलेट पेपरने मतदान घेण्याच्या मागणीसाठी नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. काही गावांमध्ये मतदानच झाले नाही. यात साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यातील तई (बुज), मुरमाडी, पारडी, घोडेझरी या गावांमध्ये बुधवारला फेरमतदान घेण्यात आले आहे.यावेळी तई (बुज) येथील मतदान केंद्रावर महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी व अध्यक्ष प्रियंक बोरकर यांच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून मतदान करायला गेले होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी प्रियंक बोरकर यांना अटक करून पालांदूर पोलीस ठाण्यात नेले. तिथे काही वेळ थांबवून सोडण्यात आले.सोमवारला झालेल्या मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशिन बंंद पडल्याने येथे मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे गावातील तसेच पोटाची खळगी भरण्याकरीता बाहेरगावी गेलेल्या मतदारांना मतदानापासुन वंचित राहुन घरी परतावे लागले होते. त्यामुळे या चारही तई (बुज), मुरमाडी, घोडेझरी, पारडी या गावांमध्ये बुधवारला फेरमतदान घेण्यात आले.दरम्यान, आज संतप्त महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना तई शाखेच्या काही युवकांनी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने मतदान करण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून मतदान करायला जात असता पोलिसांनी त्यांना अडविले.या प्रकाराबाबत गावात काही काळ वातावरण तापले होते. मतदानावर बहिष्कार न टाकता केवळ ईव्हीएम मशिन हटवून बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी निवडणूक आ़योगाच्या विरोधात निषेध केल्याचे या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.