शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

वत्कृत्व स्पर्धेत दिशा व पारसची बाजी

By admin | Updated: August 4, 2016 00:37 IST

वत्कृत्व स्पर्धेला दिलेले दोन विषय भारतीय सण व भारतीय संस्कृती कठीण वाटत असताना...

२७ शाळांतून स्पर्धक : जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसादभंडारा : वत्कृत्व स्पर्धेला दिलेले दोन विषय भारतीय सण व भारतीय संस्कृती कठीण वाटत असताना जिल्ह्यातील २७ शाळेमधून इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम, ७१ स्पर्धकांनी आपले मत मांडताना भारतातील विविध सण व संस्कृती यांचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे आयोजन येथील मंगलम् सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सायंन्स अकॅडमिचे संचालक नरेंद्र पालांदूरकर, अरविंद लांजेवार, डॉ. मुकूंद आडूलकर, विक्रम फडके यांच्या हस्ते करण्यात आले. वयोगट ५ ते १० मधून रॉयल पब्लिक स्कूलची दिशा शेवाळे प्रथम क्रमांकाकरिता निवडण्यात आली. भारतीय सणाची विशेषता सांगताना अनेकतेत एकता कशी आहे हा मुद्दा पटवून दिला. स्प्रिंगडेल स्कूलचा परिमल कोरे द्वितीय तर महिला समाज शाळेचा गिरीज धकातेनी तृतीय क्रमांक पटकाविला तर प्रोत्साहनपर आर्या वाढई, दिशांत धाबेकर, खुशी पुरूषार्थी सृजल येले यांची निवड करण्यात आली.वयोगट ११ ते १५ मधून सनिज स्प्रिंग डेल शाळेचा विद्यार्थी पारस कोरे यांची प्रथम क्रमांक पटकावून प्रेक्षकांची मन जिंकली. भारतीय संस्कृती ही मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहे, असे मत व्यक्त केले तर त्याच शाळेची रक्षा चोपकर द्वितीय व संत शिवराम महाराज शाळेचा नुशार बावणकर याने तृतीय क्रमांकाचे बक्षिस जिंकले. प्रोत्साहनपर मनिष झाडे, नंदिनी भावसार, ईश्वरी मुनगिनवार, प्राप्ती टांगले व सानिध्य शुक्ला यांची निवड झाली. डॉ. मनिषा भोयर, परिक्षक विक्रम फडके, किरण भावसार व ग्रिष्मा खोत यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून जयेश भावसार यांनी बालविकास मंचच्या उपक्रमाची स्तुती करून अशाच शैक्षणिक कार्यक्रम वार्षिक उपक्रमात राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त करून मनोगत व्यक्त केले. जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी बालविकास मंच सदस्य नोंदणी अभियान २०१६-१७ ची माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात महर्षी विद्या मंदिर, सेंट पिटर्स स्कूल, सेंट पॉल, पोदार स्कुल, कारधा, जीएनटी कॉन्व्हेंट नूतन कन्या, लाल बहादूर शास्त्री, उज्वल कॉन्व्हेंट, अंकुर विद्या मंदिर, प्राईड कॉन्व्हेंट, सेंट मेरिस स्कुल, स्कुल आॅफ स्कॉलर्स, अश्विनी स्कुल आॅफ एक्सेलंस, नूतन महाराष्ट्र विद्यालय, पा.वा. नवीन मुलींची शाळा, मार्डंडसर आय इंटरनॅशनल स्कूल, ड्रिम डेल स्कुल, युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कुल लाखनी, शिरिण बाई नेत्रावाला स्कुल तुमसर, जिल्हा परिषद शाळा भोवरी, जिल्हा परिषद शाळा लाखनी आदी शाळेचा समावेश होता. संचालन बाल विकास मंच जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे तर आभार युवा प्रतिनिधी स्रेहा वरकडे यांनी मानले. धनश्री खोत, तिरज बरडे व भाग्यश्री बरडे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)