शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्ये वाढलीय बलुतेदारी!

By admin | Updated: November 19, 2016 00:40 IST

सध्या देशात ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांचा तुटवडा झाल्यामुळे संपूर्ण देशातील लोकांना याचा थेट फटका बसताना दिसत आहे.

नोटांच्या तुटवड्यावर प्रभावी उपाय : पारंपरिक व्यवसायिकांना सोईस्करभंडारा: सध्या देशात ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांचा तुटवडा झाल्यामुळे संपूर्ण देशातील लोकांना याचा थेट फटका बसताना दिसत आहे. विशेष करुन शहरी भागात याचा प्रत्यक्ष परिणाम बघायला मिळत आहे. कारण एकूण चलनातून जवळपास ८० टक्के चलन मुद्रा एकाएकी बंद झाली आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये गावागावात जुन्या काळची बलूतेदारी पद्धत वापरुन नोटांच्या तुटवड्यावर प्रभावी उपाय योजना अमलात आणण्याचे काम ग्रामीण जनता करीत आहे. यात विशेषकरुन शेतकरी वर्ग आणि पारंपरिक व्यवसाय व कुटीर उद्योग करणारे लोक या बलुतेदारी पद्धतीचा उपयोग करीत आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत.बलूतेदारी पद्धती म्हणजे वस्तुच्या बदल्यात वस्तू प्राप्त करुन आपली गरज भागविणारी वस्तु विनिमय प्रणाली आहे. ही प्रणाली आदिकाळापासून भारतीय अर्थव्यवस्थेत आपली महत्वाची भूमिका पार पाडत राहिली आहे. एकीकडे नोटबंदीमुळे नोकरदार, व्यापारीक, सेवा कार्य करणारा वर्ग कमालीचा त्रस्त आहे. अशातच गावात राहणारा शेतकरी आपले सामान्य जीवन जगताना दिसत आहे. याला मुख्य कारण असे की, ग्रामीण भागात शेतकरी वर्ग सर्वात जास्त प्रमाणात वावर करीत असून त्यापाठोपाठ मजूर वर्ग वास्तव करीत असतो. सध्या खरीपाच्या धानपीकाची कापणी आणि मळणीचे काम जोरात सुरु आहे. अशात शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. परंतु सर्वांची गरज भागविणारी वस्तू म्हणजे पोटाला अन्न रुपात महत्वाचे घटक तांदुळ निर्माण करणारा धान त्यांच्या भंडारात भरपूर प्रमाणात आहे. त्यापासून कोणताही शेतकरी केव्हाही अर्थार्जन करु शकतो. धान पीक ही आपल्या शेतकरी वर्गाची सर्वात मोठी ताकद आहे. यंदा भरघोस धान उत्पादन झालेले दिसत असून शेतीवर अवलंबित मजूर वर्गाला सुद्धा धान सहज उपलब्ध होते. कारण की मजूरी करवून घेणारा शेतकरी सुद्धा मजूरीच्या मोबदल्यात पैसे न देता धान देतो. आदी काळात मुद्रेचा जन्म होण्यापुर्वी लोक बलुतेदारी पद्धती म्हणजे वस्तू विनिमय प्रणालीच्या आधी आपल्या गरजा भागविण्याचे काम करीत असे. कुंभार आपले मडके किंवा मातीचे भांडे शेतकऱ्याला देऊन त्याच्याकडून धान, तांदूळ, तुर, दाळ इत्यादी शेतीत उत्पादन होणारे धान्य घेत असे. तेल काढणारा तेली सुद्धा आपले तेल विविध वर्गाला देऊन त्या-त्या व्यक्तीकडून त्यांच्याकडील वस्तू प्राप्त करायचे. अशा व्यवहारात मुद्रा महत्वाची राहत नाही. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये कालांतराने अनेक अडचणी भासू लागल्या. यात मुख्य करुन काही लोकांची वस्तू महाग तर काहींची स्वस्त राहिल्याने देवाण-घेवाण करताना परवडत नसे. तसेच काहींकडे अनेक वस्तू तर काहींकडे एकच वस्तू तेवढ्याच किमतीची असायची. परंतु ती एक वस्तू सगळ्यांना वाटून देता येत नव्हती.या अडचणीतून मुद्रेचा जन्म झाला. चलनात वस्तू किंवा सेवेऐवजी मुद्रेची देवाण-घेवाण सुरु झाली. आधी विविध वस्तू व दगडांचा मुद्रेच्या रुपात उपयोग व्हायचा नंतर धातू मुद्रा जन्माला आली. यात ही वेगवेगळे स्वरुप काळानुसार बदलत गेले. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा राहिल्या आहेत. बदलत्या जीवन शैलीनुसार विलासीत जीवनाच्या गरजा वाढू लागल्या. यासाठी कागदी मुद्रेचा उपयोग चलनात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. भारतीय समाज व्यवस्थेत अनेकांनी मुद्रा संग्रहीत करुन ठेवण्याऐवजी मौल्यवान वस्तू ,दागिणे, किमती धातू संग्रहीत करुन ठेवण्याची पद्धत सुद्धा टिकून राहिली आहे. चलन मुद्रेच्या रुपात कागदी मुद्रेच्या अधिक वापरामुळे समाजात गरिबी-अमिरी ची दरी सुद्धा वाढत राहिली.परंतु या सर्व घडामोडी चालत असताना मानवाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी वस्तू विनिमय प्रणाली जास्त उपयोगी ठरत राहिली. तीन मुलभूत गरजापैकी निवासाची गरज एकदा पूर्ण झाली की अनेक वर्षासाठी कायम असते. वस्त्राची गरज काही काळासाठी पूर्ण होते. परंतु अन्नाची गरज रोजची असते. अशात चलन मुद्रा असो किंवा नसो ती गरज मानवाला पूर्ण करावीच लागते. अशावेळी वस्तू विनिमय हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. नेमका याचाच फायदा सध्या ग्रामीण भागात घेतला जात असून सध्या बलुतेदारी पद्धतीचा अवलंब करून नागरिक आपल्या गरजा भागवित आहेत. (नगर प्रतिनिधी)