शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा गावात अज्ञाताची दहशत; गावकऱ्यांची उडाली झोप, रात्रभर द्यावा लागतोय जागता पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 14:03 IST

काही दिवसांपूर्वी गावात आलेल्या एका पाहुण्याला गावकऱ्यांनी संशयावरून चांगलाच प्रसाद दिला होता.

सुरभी शिरपूरकर

भंडाराजिल्ह्यातील पोहरा हे गाव सध्या चर्चेत आहे. दिवसभर काम करून या गावचे लोक रात्रभर जागरण करत आहे. कारणही तसंच आहे. एका अज्ञात व्यक्तीनं या गावकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. 

पोहरा गावात मागील २५ दिवसांपासून एका अज्ञात व्यक्तीची दहशत पसरली आहे. यामुळे, नागरिक रात्रभर लाट्या- काठया घेऊन पहारा देतात. हा अज्ञात व्यक्ती रात्री गावात येऊन महिलांची छेड काढतो, पाठलाग करतो. पुरुषांनाही त्रास देतो, अन् गायब होतो असा गावकऱ्यांचा दावा आहे. गेल्या २५ दिवसांपासून गावात हा प्रकार सुरू असून यामुळे ग्रामस्थ दहशतीत आहेत. याचा परिणाम म्हणून गावात रात्री बेरात्री येणाऱ्या व्यक्तीकडे गावकरी संशयानं पाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी गावात आलेल्या एका पाहुण्याला गावकऱ्यांनी संशयावरून चांगलाच प्रसाद दिला होता.

या संपुर्ण प्रकरणावरून गावात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दंतकथा रंगवल्या जात आहेत. अज्ञात व्यक्ती चोर की भूत यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे, गोष्टी रंगवल्या जात आहेत. सुरुवातीला कोणीतरी खोडकर व्यक्ती मस्करी करत असल्याचा भास ग्रामस्थांना झाला. मात्र, हा प्रकार दिवसेंदिवस होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गावात गस्तही दिली परंतु, चोर काही हाती लागला नाही. या प्रकारामुळे ग्रामस्थांचे सायंकाळी बाहेर निघणेही बंद झाले आहे. तर दुसरीकडे हा एखादा मानसिक रोगी असावा जो गावात दहशत पसरवतोय, असे समिती सदस्य सांगत फिरत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा