शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या पात्रामुळे ग्रामस्थांचा जीव मुठीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 05:00 IST

वैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असून पावसाळ्यात तीरावरील गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. तालुक्यातील रेंगेपार येथे तर भयावर स्थिती आहे. थोडे-थोडे करत आता वैनगंगेचे पात्र गावाजवळ पोहचत आहे. पावसाळ्यात थडी खचत आहे. हा प्रकार गत २० वर्षांपासून होत असला तरी प्रशासनाला केवळ पावसाळ्यात जाग येते. सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक बंदचा फलक लावते. मात्र प्रभावी उपाययोजना केल्या जात नाही.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आधीच विशाल असलेले वैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असून पावसाळ्यात तीरावरील गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. तालुक्यातील रेंगेपार येथे तर भयावर स्थिती आहे. थोडे-थोडे करत आता वैनगंगेचे पात्र गावाजवळ पोहचत आहे. पावसाळ्यात थडी खचत आहे. हा प्रकार गत २० वर्षांपासून होत असला तरी प्रशासनाला केवळ पावसाळ्यात जाग येते. सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक बंदचा फलक लावते. मात्र प्रभावी उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे रेंगेपार येथे नदी तीरावर अनेक कुटुंब जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत आहे. तुमसर तालुक्यातील रेंगेपार गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. दरवर्षी पाण्याचा प्रवाह गावाच्या दिशेने वेगाने येत आहे. त्यामुळे गावातील मुख्य रस्ता नदीजवळ आला. नदी तीरावर नागरिकांची घरे आहेत. काही नागरिक येथून सुरक्षित स्थळी गेले आहेत. तर काही नागरिकांचे वास्तव्य आजही आहे. त्यांना येथे जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागते. गुलाब कावळे, विनोद मारबते पंचफुला मते, मेश्राम या कुटुंबांचे वास्तव नदी तीरावरील घरात आहे. 

अपघातानंतरच प्रशासनाला जाग येईल का?- दरवर्षी पावसाळ्यात प्रशासनाला जाग येते. मात्र जुजबी दुरुस्ती व कारवाई करून सोपस्कार पार पडले जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाने नदी तीरावर धोक्याच्या सूचनेचा फलक लावलेला आहे. फलकावर जड वाहतूक करू नये, अशा सूचना दिल्या आहे. पूरसदृश परिस्थितीत नदी तीरावर भूस्खलन होऊन काठावरील घरे व रस्ता नदीपात्रात समाविष्ट होण्याची भीती येथे कायम आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा शासन व प्रशासनाला निवेदन दिली. आंदोलने केली. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. अपघातानंतरच प्रशासनाला जाग येईल का असा सवाल गावकरी करीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात नदीतीरावरील कुटुंब जीव मुठीत घेवून आहेत.

रेंगेपार येथे वैनगंगा नदीपात्र रस्त्याच्या कडेपर्यंत पोहोचले आहे. परंतु अद्यापही नदी तीरावर काही कुटुंबाचे वास्तव्य आहे. प्रशासनाने दाखल घ्यावी. आतापर्यंत अनेकदा तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदारापासून मंत्र्यांपर्यंत सर्वाना निवेदने दिली. परंतु अद्याप यावर कुणी उपाय योजले नाही.- बन्सीलाल नागपुरे, सरपंच, रेंगेपार.

रेंगेपार येथे पावसाळ्यात अतिशय धोकादायक स्थितीत मार्गक्रमण करावे लागते. गावाच्या दिशेने वैनगंगा नदी झपाट्याने येत आहे. याची माहिती शासन व प्रशासनाला दिली आहे. गावाला बायपास रस्ता नाही. प्रस्ताव पडून आहे. प्रशासनाने उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल. - हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती तुमसर.

 

टॅग्स :riverनदी