शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तपासावर गावकऱ्यांचा अविश्वास

By admin | Updated: December 29, 2014 01:01 IST

तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत.

मोहाडी : तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत. आरोपी महिलेने केलेले दुष्कृत्य बघून तिला जामिन मिळाल्या नंतर गावात राहु देणार नाही. सर्व आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, खुटसावरी येथे पोलिसांची गस्त सुरू करावी आदी मागण्या खुटसावरी येथील गावकऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केल्या आहेत.पत्र परिषदेला सरपंच देवदास लिल्हारे, तंटामुक्ती अध्यक्ष विजयकुमार पशिने, मिलींद लोणारे, निलुबाई बशिने, बचत गट अध्यक्षा रत्नमाला लिल्हारे, वासुदेव धांडे, रविंद्र धांडे, हिरामण धांडे, लिलाधर वैद्य, तारा उके, रविशा धांडे, गुलाब सेलोकर, शंकर दमाहे सह गावातील नागरिक व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवुन आरोपींना २४ तासात अटक केली. त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे से वाटते. मात्र त्यानंतर चौकशीत पोलीसांनी वेळकाढु धोरण अवलंबिले. हत्या झाली त्या दिवशी मृतकाचा साळा घरी होता व त्यानेच खुन झाल्याचे सकाळी सांगितले. मात्र त्याची चौकशी न करता त्याला सोडण्यात आले. मृतकाचा मोबाईल पोलीसांना हस्तगत करता आला नाही. मृतकाच्या पत्नीने आपली साडी लपवून ठेवली होती व त्या साडीवर रक्ताचे डाग होते हे काही गावकऱ्यांनी पाहिले आहे. त्या दिशेने तपास करण्यात आला नाही. मृतकाकडे गळ््यातील गोफ, मंगळसूत्र, दोन आंगठ्या, टॉप्स होते ते कुठे गेले हे पोलीसांनी तपासून बघितले नाही. ते दागीने पोलिसांनी मिळवून द्यावे. मृतकाच्या साळ्याने मोटारसायकल घेवून गेला ती मोटारसायकल मिळवून याची खबरदारी घ्यावी, तसेच या प्रकरणाचा निकाल जलदगतीने लावून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. मृतकाच्या तीन वर्षीय मुलीला शासकीय मदत देण्यात यावी, मातामाय मंदिरात हत्या झाल्याने या मंदिराचे शासकीय खर्चाने शुध्दीकरण करण्यात यावे. तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा. गावातील प्रत्यक्षदर्शीचे बयाण घेण्यात आलेले नाहीत ते बयाण लवकर घेण्यात यावे. बिट अंमलदार चोपराम निरगुळे यांनी गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे आदी मागण्या पत्रपरिषदेत करण्यात आल्या. या मागण्या मंजूर झाल्या नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या प्रकरणात गावकऱ्यांत मोठा रोष असल्याचे जाणवत होते. (शहर प्रतिनिधी)