शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:13 IST

भंडारा जिल्हयात शाश्वत स्वच्छता आणि प्लॉस्टीक बंदीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे.

ठळक मुद्देनवरगावात प्लॉस्टिक बंदी : महिलांना वितरित केल्या कापडी पिशव्या

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा जिल्हयात शाश्वत स्वच्छता आणि प्लॉस्टीक बंदीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे. ग्राम पंचायत स्तरावर शाश्वत स्वच्छतेसाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत तर बहुतांश ठिकाणी प्लॉस्टीक बंदीसाठी नागरिक पुढे सरसावले आहेत.तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे ग्राम पंचायतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हळीदीकुंकू कार्यक्रमात महिलांना प्लॉस्टीक बंदीसाठी वाणात कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात जिल्हयात प्लॉस्टीक बंदी व्हावी याकरिता पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायतस्तरावर हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून गावात शाश्वत स्वच्छता ठेवणे व प्लॉस्टीक बंदीचा संदेश व कापडी पिशव्यांचा वापर व्हावा असा उदेश्य आहे. ग्राम पंचायतस्तरावर कार्यक्रमातून शाश्वत स्वच्छता व प्लॉस्टीक बंदीचा संदेश दिल्या जात आहे.स्वच्छतेसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाला लाखांदूर तालुक्यातील विरली बुजचे सरपंच लोकेश भेंडारकर यांची उपस्थिती होती. तसेच सरपंच संध्या प्रभाकर गुरवे, सचिव विद्या गजभिये, ग्राम पंचायत सदस्या शंकुतला सोनारे, मंगलाताई गुरवे, रेखा पासवान, पोलिस पाटील मिनाक्षी लाडसे, विनोद गुरवे, प्रभाकर गुरवे, जिल्हा कक्षाचे अंकुश गभने, राजेश येरणे, पंचायत समिती गट संसाधन केंद्राचे पल्लवी तिडके, हषार्ली ढोके, पौर्णिमा डूंबरे, वर्षा दहीकर, सरिता गुरवे, प्रशांत गुरवे उपस्थित होते.भेंडारकर यांचा सत्कारज्या ग्राम पंचायतचा आदर्श घेवून गाव घडविण्यात आले. त्या लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच लोकेश भेंडारकर यांचा ग्राम पंचायतच्या वतीने सरपंच संध्या गुरवे यांचे सत्कार केला. भेंडारकर यांनी, ग्राम पंचायतने गावात घडविलेल्या स्वच्छतेच्या परितर्वनाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. असेच कार्य गावाने केले तर आपला गाव हा संपूर्ण जिल्हयात आदर्श ठरेल असा आशावाद व्यक्त केला. शाश्वत स्वच्छतेसाठी गावात राबविलेल्या उपक्रमाने गावाची शान वाढलेली असून सर्वत्र नवरगावची प्रशंसा होत असल्याचे सांगितले. सरपंच संध्या गुरवे यांनी साधल्याने त्यांची अभिनंदन केले व भविष्यात नवरगावाला आदर्श, स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.प्लॉस्टीक बंदीसाठी सरसावल्या महिलादरवर्षी मकर संक्रांती पासुन हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून महिला वाण वाटत असतात. वेगवेगळे वस्तू वाणस्वरूपात दिल्या जातात. परंतु यावेळी नवरगाव येथे वाणात आपल्याला कोणती वस्तु देणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हळदी कुंकू कार्यक्रमातून ज्या प्रमाणे शाश्वत स्वच्छता व प्लॉस्टीक बंदीचे आवाहन करण्यात आले त्या प्रमाणे सर्वात प्रथम सरपंच लोकेश भेंडाकर, सरपंच संध्या गुरवे, पोलिस पाटील मिनाक्षी लाडसे यांचे हस्ते कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर ग्राम पंचातयच्या महिला सदस्यांनी वाणात सगळया महिलांना कापडी पिशव्या देवून यापूढे प्लॉस्टीक पिशवी नाही तरी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. कापडी पिशव्यांचा वापर दैनंदिन वापर करण्याचे या प्रसंगी महिलांनी सांगितले.