शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अंधांना दृष्टी दान करणारे गाव विरली

By admin | Updated: October 15, 2015 00:49 IST

अंध व्यक्तींच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश देण्यासाठी नेत्रदान ही एक चळवळ व्हावी यासाठी येथील ग्रामायण प्रतिष्ठान कार्यकरीत आहे

जागतिक अंध दिन आज : ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे ६५ व्यक्तींचे नेत्रदानहरिश्चंद्र कोरे विरली (बु.)अंध व्यक्तींच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश देण्यासाठी नेत्रदान ही एक चळवळ व्हावी यासाठी येथील ग्रामायण प्रतिष्ठान कार्यकरीत आहे. या प्रतिष्ठानमार्फत आजपर्यंत एकूण ६५ व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान करून या कार्यासक्रियतेने सहभाग दिलेला आहे. यात ६ वर्षाच्या बालीकेपासून ९० वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या व्यक्तींनी नेत्रदान करून अंधत्व निवारणाच्या राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे.ग्रामायण प्रतिष्ठान ही संस्था २००४ पासून विरली येथे कार्यरत आहे. सेंद्रिय शेती, पारंपरिक बियाणे संवर्धन, मृदा आणि जलसंवर्धन यासोबतच रक्तदान, नेत्रदान, देहदान या चळवळी समाजात रूजविण्यात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ३५० व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला असून ६५ व्यक्तींनी नेत्रदान केले आहे. सुमारे ५०० व्यक्तींनी रक्तदान केले असून २५० स्वयंसेवी त्यांची चमू आहे. त्याचप्रमाणे देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे.३० व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्यानिमित्ताने पदमश्री डॉ. विकास महात्मे यांनी संस्थेच्या नेत्रपेढी नागपूरच्या डॉ. रेखा खंडेलवाल, एन.के.पी. साळवे वैद्यकीय संस्था नागपूरचे अधिष्ठाता डॉ. विकास मित्रा, डॉ. सुनिता महात्मे, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रणजित देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ६ वर्षाच्या मुलीचे नेत्रदान करणारी आई वैशाली सुरेश भेंडारकर यांचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.नेत्रदानप्रसंगीचे भावूक क्षणअर्चना दादा चुटे (२२) हिच्या मृत्यूनंतर नेत्रतज्ज्ञांची चमू येण्यास वेळ लागल्यामुळे शेवटी तिचा मृतदेह सरणावर ठेवल्यानंतर स्मशानभूमीत नेत्रदान करण्यात आले.१९ वर्षीय मनीषा जागेश्वर भेंडारकर हिचा अपघात झाला. उपचारादरम्यान तिचे निधन झाले. मात्र तिच्या मातापित्यांनी या दु:खद क्षणीही तिचे नेत्रदान केले.दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षांच्या खुशबूचे हृदयविकाराने निधन झाले. तिच्या आईवडिलांनी काळजावर दगड ठेवून मुलीचे नेत्रदान केले.