शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी विधानसभा अध्यक्षांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 06:00 IST

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचा थांबा नाही. याबाबत समितीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे रेटा धरला. मात्र त्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच रेल्वे बोर्डही या मागणीकडे सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे रेल्वे यात्री सेवा समितीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गत महिन्यात नागपूर-सिकंदराबाद या रेल्वे गाडीला रायपूरपर्यंत विस्तारित करण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : जिल्हा रेल यात्री सेवा समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलद गती गाड्यांचा थांबा देण्यात यावा या मागणीला घेऊन भंडारा जिल्हा रेल यात्री सेवा समितीतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. याबाबत कारवाई करण्याचे आश्वासनही पटोले यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचा थांबा नाही. याबाबत समितीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे रेटा धरला. मात्र त्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच रेल्वे बोर्डही या मागणीकडे सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे रेल्वे यात्री सेवा समितीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गत महिन्यात नागपूर-सिकंदराबाद या रेल्वे गाडीला रायपूरपर्यंत विस्तारित करण्यात आले. यात रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, अजनी, वरोरा, चंद्रपूर या ठिकाणी थांबे देण्यात आले. मात्र भंडारा रोड रेल्वे स्थानकाला थांब्यांमधून वगळण्यात आले.लोकप्रतिनिधी मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. समितीच्या मागणीवरून नागपूर विभागीय व्यवस्थापकांनी बिलासपूर-पुणे या गाडीच्या थांब्यासाठी बिलासपूर संभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. परंतु वर्षभराचा कालावधी लोटूनही कारवाई झालेली नाही. परिणामी या रेल्वेगाडीचा थांबाही देण्यात आला नाही. दरम्यान या मागणीला घेऊन रेल्वे समितीचे सचिव रमेश सुपारे, सुरेश फुलसुंगे यासह अन्य पदाधिकाºयांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सदर निवेदन सादर केले.अन्य गाड्यांसाठीही रेटारेल्वे यात्री समितीने यापूर्वी ज्ञानेश्वरी, हावडा-कुर्ला-पुरी-शिर्डी या गाड्यांचे थांबे मिळावे व सेवाग्राम एक्सप्रेस गोंदियापर्यंत विस्तारित करण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच लोकप्रतिनिधींसह रेल्वे बोर्ड व अधिकाºयांना निवेदन दिले. परंतु राजकीय इच्छाशक्ती या कामी कमी पडली. याबाबतही कुठलीच भूमिका घेण्यात आली नाही. मात्र या गाड्यांच्या थांब्यासाठी रेलयात्री सेवा समितीने रेटा धरला आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले