शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी पक्ष एकत्रित पोटनिवडणूक लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:53 IST

भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या उद्देशाने अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन उमेदवार लढविण्याचा एकमताने निर्णय घेतला असल्याचे माजी महाधिवक्ता विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड.श्रीहरी अणे आणि विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देआज नामांकन दाखल करणार : अणे व तिरपुडे यांची संयुक्त घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या उद्देशाने अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन उमेदवार लढविण्याचा एकमताने निर्णय घेतला असल्याचे माजी महाधिवक्ता विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड.श्रीहरी अणे आणि विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.यावेळी तिरपुडे म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे आमिष दाखवून विदर्भात भरघोस यश मिळविणाºया भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसह कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना विदर्भ राज्याची मागणी थेट मतदारामार्फत मतपत्रिकेच्या माध्यमातून शासनकर्त्यांपर्यंत पाठविण्याच्या अनुषंगाने विदर्भवादी नेत्यांनी एकत्रितपणे निवडणुकी लढण्याचे ठरविले आहे. उद्या गुरूवरला विदर्भवादी पक्षाचा उमेदवार अक्षय पांडे हे नामांकन दाखल करणार आहेत. सर्व विदर्भवादी पक्षनेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवार हा पूर्णपणे विदर्भवादी असेल व विदर्भ राज्य निर्मिती व विकासाच्या मुद्यावर मते मागितली जातील. विदर्भाच्या विषयावर विदर्भातील जनतेने राजकीय पक्षांना कशाप्रकारे प्रतिसाद दिला व विजयानंतर हे पक्ष वेगळ्या विदर्भ निर्मितीला कसे विसरले हे प्रचारादरम्यान मतदारांना सांगण्यात येईल. नवनिर्वाचित खासदारांना केवळ आठ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असल्यामुळे विदर्भाचा व्यक्ती विदर्भाकरिता निवडून देण्याचे आवाहन करण्यात येईल. विदर्भाबाबत विविध राजकीय पक्षांनी दिलेली आश्वासने ही जनतेसमोर मांडण्यात येतील, असेही तिरपुडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अ‍ॅड.नीरज खांदेवाले, डॉ.नितीन तुरस्कर, दुर्वास धार्मिक, अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर उपस्थित होते.