शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पशुवैद्यकीय दवाखाना प्रभारीच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:39 IST

पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय प्रथम श्रेणी पद मागील सहा महिन्यापासून प्रभारी असून पट्टीबंधक व परिचर यांच्या खांद्यावर असह्य भार जड होत असून पशुपालक खासगी उपचारातून होरपळत आहेत.

ठळक मुद्देस्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : पशुपालक चिंतेत

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय प्रथम श्रेणी पद मागील सहा महिन्यापासून प्रभारी असून पट्टीबंधक व परिचर यांच्या खांद्यावर असह्य भार जड होत असून पशुपालक खासगी उपचारातून होरपळत आहेत.लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकातील प्रभावी गाव पालांदूर ख्यातीप्राप्त आहे. सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्याची परंपरा पालांदूरवासीयांची मोडीत निघत वर्तमानात स्थानिक लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने पालांदूरला शासकीय सेवा कमी होत आहे. यातून विकास मागे जात असून भूतकाळातला विकास व नेतेमंडळींची आठवण होत आहे. ग्रामीण रुग्णालयाला पशुवैद्यकीय दवाखान्याला पात्र डॉक्टर नाही. बायपासचे भिजत घोंगडे आहे. तलाठी कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही. नायब तहसील कार्यालय नाही. असे कित्येक प्रश्नांनी पालांदूरवासी बेजार आहेत. पण लोकप्रतिनिधी कर्तव्यात नापास होत असल्याने सामान्यांना त्यांचा हक्क मिळत नाही. लोकप्रतिनिधी कंत्राटदारीत जाम खुश असल्याने पैसा लगाव पैसा कमाव सूत्रात बांधले जात आहेत. सेवाभाव गहाण असल्याने तालुक्याचे व जिल्ह्याचे सक्षम अधिकारीही पालांदुरच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.पालांदूर व परिसरातील हजारो शेतकऱ्यांकडे पशुधन टिकून आहे. उदरनिर्वाहाकरिता शेतीला आधार समजत दुधासोबत शेणखताकरिता पशुपालन अत्यंत महत्वाचे आहे. पण हे पशुधन शासकीय निराशेपोटी संकटात सापडले आहे.पालांदूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील प्रथम श्रेणी पशुविकास अधिकारी डॉ.प्रज्ञा झावरे मागील सहा महिन्यांपासून प्रसूती रजेवर आहेत. त्यांच्या जागी नव्याने अधिकारी न आल्याने एवढा मोठा दवाखाना पट्टीबंधक व परिचर यांच्या भरोशावर सुरु आहे. जेवढे कळते तेवढे उपचार करीत असल्याची कबुली उपस्थित कर्मचाºयांनी दिली.खासगीतील वैद्यक पशुपालकांच्या घरी जात पशुचिकित्सा करीत अमर्याद फिस लोटत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानात जमेल तेवढी चिकित्सा करून मोकळे होत आहेत. एकाने तर एखाद्या पशुची चिकित्सा केली व आरोग्यात सुधारणा नाही झाली किंवा काही कारणाने दुसºया चिकित्सकास बोलावले तर त्यांनाच बोलवा म्हणत नव्याने उपचार करण्याकरिता वेडेवाकडे घेतले जाते. शासकीय सेवा नसल्याने त्यांचीच हुजूरीगिरी करीत, ‘साहेब चला ना.. गाय, बैल, शेळी आजारी आहे’, अशी विनवणी करावी लागत आहे. पालांदुरात दररोज हजारो लिटर दुधाची उलाढाल होत आहे. शेळ्या, कोंबड्यांचा बाजार जिल्ह्यात सुपरिचित आहे. पशुधन हल्ली संकटात आले असून शासकीय प्रशासकीय अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.तीन महिन्यांपासून पालांदुरचे पशुवैद्यकीय पद सांभाळतआहे. किटाडी येथे कार्यरत असून मंगळवार व गुरुवारला वेळेनुसार प्रामाणिकपणे सेवा देत आहे. सद्या माझी प्रकृती बरी नसल्याने सुटीवर आहे.-डॉ.सी.एल. लोणारे, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी, पालांदूर.