शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

वाहन उलटले; १५ वऱ्हाडी जखमी

By admin | Updated: April 26, 2015 00:41 IST

भंडारबोडी येथून बघेडा येथे वऱ्हाडी घेऊन जाणारे चारचाकी वाहन चिचोली-सौदेपूर फाट्यावर उलटले. यात १५ वऱ्हाडी जखमी झाले.

सहा प्रवासी गंभीर : सौदेपूर-चिचोली फाट्यावरील घटनातुमसर : भंडारबोडी येथून बघेडा येथे वऱ्हाडी घेऊन जाणारे चारचाकी वाहन चिचोली-सौदेपूर फाट्यावर उलटले. यात १५ वऱ्हाडी जखमी झाले. सहा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडला. जखमींवर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.मध्य प्रदेशातील भंडारबोडी येथील शिवशंकर भगत यांचेकडील वऱ्हाड बघेडा येथे मुरलीधर बिसने यांचेकडे जात होती. वाहनात १५ वऱ्हाडी बसले होते. वाहन एमएच १८ ई ९४९ चिचोली सौदेपूर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. यात संकेत शरणागत (१३) रा. नवेगाव, बुधराम भगत (५५) भंडारबोडी, मंगरू शरणागत (६०) काचेवानी, चंद्रकांत चौधरी (२८) नवेगाव चालक, चैनलाल कोडवते (२८) भंडारबोडी, प्रेमसागर सोनवने (१५) काचेवानी, आशिष तुरकर (१४) सुकळी नकुल गंभीर जखमी झाले. अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. रात्री ८.३० दरम्यान हा अपघात घडला. जंगलव्याप्त परिसर असल्याने जखमी प्रवाशांची तारांबळ उडाली होती. ग्रामस्थांनी तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता प्रवाशांना दाखल केले. बहुतांश प्रवाशांना डोके, हातपायाला जखमा झाल्या.गोबरवाही पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या वाहनात बसले होते. आंतरराज्यीय सीमा सताड उघड्या असून लग्नाचा हंगाम सुरू असून अशा वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे.मध्य प्रदेशातून हे वाहन महाराष्ट्रात दाखल झाले. कर्तव्यदक्ष पोलिसांनी या वाहनाची साधी दखल घेतली नाही. तुमसर-वाराशिवनी व तुमसर-कटंगी मार्गावर शेकडो वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन दररोज धावत आहेत. अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)