शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बपेरा आंतरराज्यीय सीमेवर वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:46 IST

नजीकच्या मध्यप्रदेशात लोकसभा निवडणुकीचे दोन चरणातील मतदान शिल्लक आहे. या शिवाय बपेरा आंतरराज्यीय सीमेवरून नक्षलग्रस्त दोन जिल्ह्याच्या सीमा हाकेच्या अंतरावर असल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. सीमेवर वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेशात दोन चरणातील मतदान शिल्लक : नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस अलर्ट

रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : नजीकच्या मध्यप्रदेशात लोकसभा निवडणुकीचे दोन चरणातील मतदान शिल्लक आहे. या शिवाय बपेरा आंतरराज्यीय सीमेवरून नक्षलग्रस्त दोन जिल्ह्याच्या सीमा हाकेच्या अंतरावर असल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. सीमेवर वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.नजीकच्या मध्यप्रदेश राज्य शेजारी बपेरा आंतरराज्यीय सीमा हाकेच्या अंतरावर आहे. या सीमेच्या लगत नक्षलग्रस्त बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे. यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ही सीमा प्रशासन 'सिल' करीत आहेत.या सीमेवर यापुर्वी पोलीस चौकी तैनात असताना निवडणूक प्रशासनाने स्वतंत्र पोलीस तैनात करीत आहे. पोलीस चौकी आणि राहुटी मधील पोलीस बपेरा आंतरसीमेवर नियुक्त करण्यात आली आहे. सीमेवर पोलिसांचा जमावडा असल्याचे चित्र आहे.नजीकच्या मध्यप्रदेशात दोन चरणातील मतदान शिल्लक आहे. या शिवाय गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे कारवाया वाढल्या असल्याने सीमेवरील पोलिसांना अलर्ट राहण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत.बपेरा आंतरराज्यीय सीमेवर महाराष्ट्रातून जाणारे आणि मध्यप्रदेशातून येणाऱ्या चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रथम टप्प्याच्या चरणातील मतदानाच्या कालावधीत याच आंतरसीमेवर पोलिसांनी एका वाहनांतून लाखो रुपये जप्त केले होते. परंतु नंतर ही राशी परत करण्यात आली होती. याशिवाय अवैध साहित्य, अमली पदार्थ तथा नशायुक्त साहित्याच्या आयातीवर पोलीसांची करडी नजर आहे. साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे धरण मार्गावरून वाहनाची रेलचेल वाढली आहे. या मार्गाकडे प्रशासनाचे लक्ष नाही. यामुळे अवैध व्यवसायीकांना हा मार्ग 'सोने पे सुहागा' ठरत आहे. याच मार्गावरून गांजा या अमली पदार्थाची आयात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना अलीकडे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिली होती. या व्यवसायातील आरोपी सिहोरा गावातील होते. यामुळे या परिसरात अवैध व्यवसायीकांचे जाळे असल्याचे समोर आले आहे. निवडणूक निमित्ताने पोलीस आंतरराज्यीय सीमेवर करडी नजर ठेऊन आहेत.पोलीस ठाण्याची धुरा प्रभारींच्या खांद्यावरसिहोरा पोलीस ठाणेमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक एका मागून एक निलंबित होत आहे. वादग्रस्त पोलिसांचे स्थानांतरण होत आहेत. यामुळे पोलीस ठाणे चर्चेत आहे. ५३ पोलिसांची पदे असताना केवळ २५ कार्यरत आहेत. या कार्यरत पोलिसांपैकी अर्धे अधिक अनुपस्थितीत आहेत. ४-५ पोलीस ४७ गावांची सुरक्षा करीत आहेत. एका पोलिसांचे खांद्यावर ३५ गावांची जबाबदारी आहे. यामुळे काम आणि तपासाचा ताण त्यांच्या खांद्यावर आहे. पोलीस निरीक्षकाचे पद प्रभारीचे मानगुटीवर देण्यात आले आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.पोलीस चौकीचे काय?बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकीचा शुभारंभ तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. दुसºयाच दिवशी चौकी कुलूपबंद ठेवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. चौकी सांभाळणारे पोलीस नाही. यामुळे ही चौकी हशांचे पात्र ठरली आहे. सध्या बिट अमलदाराची नियुक्ती या चौकीत करण्यात आली आहे. परंतु चौकीला कधी कुलूप लावण्यात येईल सांगता येत नाही. पोलिसांची रिक्त पदे नियोजनबद्धरित्या नियुक्ती करण्याची ओरड परिसरात सुरु आहे. नवीन ठाणेदाराची नियुक्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस