शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला उत्पादक अडकले अस्मानी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:02 IST

परंपरागत धान उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासह पालेभाज्या पिकांची शेती केली. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याने भाजीपाला उत्पादक अस्मानी संकटात सापडल्याने त्यांचा आर्थिक कोंडमारा झाला आहे.

ठळक मुद्देकवडीमोल भाव : कोबी ३ रुपये, वांगे ६ रुपये किलो दराने विक्री

प्रशांत देसाई ।ऑनलाईन लोकमतभंडारा : परंपरागत धान उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासह पालेभाज्या पिकांची शेती केली. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याने भाजीपाला उत्पादक अस्मानी संकटात सापडल्याने त्यांचा आर्थिक कोंडमारा झाला आहे.यावर्षी खरीप पिकांसह रब्बी पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला खरीपाचे पिक हातुन गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आशा न सोडता भाजीपाला उत्पादन घेवून आर्थिक स्थिती समतोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजीपाला उत्पादनासाठी लागलेला खर्चही त्यांना काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. किंबहूना झालेला खर्च निघेलच याची शाश्वती आता राहिली नाही.खरीप हंगामात पाऊस न पडल्याने हजारो हेक्टर शेतीतील रोवणी झाली नाही. त्यामुळे धानाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादनासाठी पालेभाज्यांची शेती केली.सध्या पालेभाज्या निघण्याचा हंगाम आहे. रब्बी पीक हातातोंडाशी आले असतानाच मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी बर्फवृष्टी झाली. यामुळे शेतातील भाजीपाल्यासह रब्बीपिकांनाही जबर फटका बसला.अवकाळी पावसासह ढगाळ वातावरणाचा फटका बसून सुस्थितीत असलेला भाजीपाला पुर्णत: खराब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कोबी, पत्ताकोबी, मिरची, वांगे, कारले, चवळी, पालक, मेथी, चवळी भाजी खराब होण्याच्या स्थितीत असल्याने तो विकूण मिळेल तो पैसा होईल.या मनस्थितीने बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणला आहे. मागील आठवड्याच्या अस्मानी संकटामुळे बाजारातही मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीला आल्याने त्याला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला कवडीमोल दरात विकावा लागत आहे.आधीच कर्जाच्या बोझ्यात असलेल्या शेतकऱ्यांसमोर या अस्मानी संकटाने पुन्हा आर्थिक दरी निर्माण केली. कर्जाचे दृष्टचक्र शेतकºयांच्या मानगुटीवर बसून असल्याचे चित्र सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. जिवापाळ जपून शेतात भाजीपाला किंवा रब्बी पिकाची जोपासना करुन त्याला अपेक्षीत भाव मिळेल व कर्जाची परतफेड करता येईल ही अपेक्षा मात्र अपेक्षाच राहिली आहे. सरकारी पाशात अडकलेल्या शेतकºयाच्या उत्पादनालाही आता भाव नसल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. उन्हाळा प्रारंभ झाला असून भाजीपाल्यांच्या दरात चढउतार दिसून येईल.मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात भाजीपाला सडविण्यापेक्षा बाजारात विक्रीला आणत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने त्याला दर अल्प मिळत आहे.- बंडू बारापात्रेअध्यक्ष बीटीबी भंडारा

टॅग्स :vegetableभाज्या