शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या विविध योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य शासनाच्या सर्व कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापण्याचा निर्णय चांगला असून यामधून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सन्मानकक्ष उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

ठळक मुद्देअविनाश कोटांगले : भंडारा तालुका कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील कृषी विकासात शेतकरी हा महत्वाचा केंद्रबिंदू ठेवून शासनाच्या विविध योजना ग्रामस्तरावर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी भंडारा तालुका कृषी विभाग कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.भंडारा तालुका कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, महिला बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसुंगे, कृषी तांत्रिक अधिकारी शांतीलाल गायधने, भंडारा मंडळ अधिकारी दीपक आहेर, पर्यवेक्षक झंझाड, आनंद पाल आदी उपस्थित होते.याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य शासनाच्या सर्व कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापण्याचा निर्णय चांगला असून यामधून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सन्मानकक्ष उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या विविध योजना व सामूहिक गट शेती केल्यास शेतकºयांना होणारा फायदा आणि त्यातून विविध संकटांवर कशा पद्धतीने मात करता येईल, यावर मार्गदर्शन केले.विविध योजनांच्या अंमलबजावणीत समन्वय साधून काम करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार याांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीत कृषी विभागाशी संबंधित इतर खात्यांचे प्रतिनिधी, सहकार उपनिबंधक, अग्रणी बँक व किमान तीन प्रगतशील शेतकरी यामध्ये एका महिला शेतकºयाचा समावेश असणार आहे. या समितीच्या बैठकीस विशेष निमंत्रीत म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी व प्रांताधिकारी यांना उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक होणार आहे. कक्षाला भेट देणाऱ्यां शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शेतविषयक मासिके, वर्तमानपत्रे तसेच विविध योजनांची परिपत्रके ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.संचालन आत्माचे सतीष वैरागडे यांनी तर, आभार प्रदर्शन कृषी सहायक रेणूका दराडे यांनी केले.अशी असेल तालुकास्तरीय समितीशेतकरी सन्मान कक्षाच्या अध्यक्षपदी तहसीलदार तर सदस्य सचिवपदी तालुका कृषी अधिकारी व उर्वरीत सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी अधिकारी, महावितरण अभियंता, अग्रणी बँक प्रतिनिधींसह तालुक्यातील तीन प्रगतीशील शेतकरी त्यामध्ये एका महिला शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यास शेतकरी सन्मान कक्ष फायदेशिर ठरणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना