२९ मार्चला ठाणा केंद्राचे केंद्र प्रमुख वसंत साठवणे साहेब यांच्या हस्ते विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. पहिल्या दोन दिवस बौद्धिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात निबंध लेखन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गितगायन, भेंड्याच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा वैयक्तिक नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. शारीरिक स्पर्धेत धावणे, लांब उडी, संगीत खुर्ची, दोरीवरच्या उड्या मारणे व फुगडी अशा स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेतील तीन विजेत्यांना दिनांक ३१ मार्चला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमनजी मोथरकर, मुख्याध्यापिका वाडिभस्मे यांच्या हस्ते कंपास, नोटबुक व पेन बक्षीस देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम वसंत काटेखाये पदवीधर शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नामदेव गभणे, इंदिरा खोब्रागडे, कोडवते, शेख यांनी सहकार्य केले.
युवा व इको क्लब अंतर्गत विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST