शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
4
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
5
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
6
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
7
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
8
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
9
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
10
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
12
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
13
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
14
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
15
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
16
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
17
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
18
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
19
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
20
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

मौल्यवान रेती मॅग्नीज खाणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:45 IST

कोट्यवधी रूपयांची मौल्यवान रेती मॅग्नीज खाणीत भराव म्हणून गत ७० वर्षांपासून वापरील जात आहे. लाखो ब्रास रेती कायमस्वरूपी भूगर्भात गाडली जात आहे. तुमसर तालुक्यातील चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत बावनथडी नदीपात्रातून रेती आणून त्याचा भराव केला जातो. विदेशात भरावासाठी रेतीला प्रर्याय शोधण्यात आले असून मॅग्नीज खाणीत आता सीसीआर अथवा फ्लॉय अ‍ॅशचा वापर करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देचिखला खाण : ७० वर्षांपासून खाणीत सुरू आहे रेतीचा भराव

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोट्यवधी रूपयांची मौल्यवान रेती मॅग्नीज खाणीत भराव म्हणून गत ७० वर्षांपासून वापरील जात आहे. लाखो ब्रास रेती कायमस्वरूपी भूगर्भात गाडली जात आहे. तुमसर तालुक्यातील चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत बावनथडी नदीपात्रातून रेती आणून त्याचा भराव केला जातो. विदेशात भरावासाठी रेतीला प्रर्याय शोधण्यात आले असून मॅग्नीज खाणीत आता सीसीआर अथवा फ्लॉय अ‍ॅशचा वापर करण्याची गरज आहे.तुमसर तालुक्यात ब्रिटीशकालीन चिखला भूमिगत मॅग्नीज खाण आहे. जगात हॉलंडनंतर उच्चप्रतिचे मॅग्नीज याच खाणीतून मिळते. या खाणीचा विस्तार प्रचंड मोठा आहे. सध्या यंत्राने भूगर्भातून मॅग्नीज काढणे सुरू आहे. दररोज लाखो टन मॅग्नीज काढले जात आहे. भूमिगत खाण असल्याने मॅग्नीज काढल्यानंतर विहिरीसारखे खोल खड्डे तयार होतात. दरड कोसळू नये म्हणून त्यात रेतीचा भराव केला जातो. गेल्या ७० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.रेतीच्या भरावासाठी मॉयल प्रशासनाने महसूल विभागाला रितसर परवानगी घेतली आहे. बावनथडी नदीपात्रात उत्खननासाठी ३० वर्षासाठी लीज घेण्यात आली आहे. नदीपात्रातून ट्रॅक्टरने रेतीचा उपसा करून नदीतिरावर साठा केला जातो. तेथून जेसीबीने रेतीची उचल ट्रकमध्ये करण्यात येते. दररोज १५ ते २० ट्रक रेती भरावाकरीता नेली जाते. गत अनेक वर्षांपासून हा क्रम सुरू आहे. मॉईलचे क्षेत्र शेकडो हेक्टरमध्ये पसरले आहे. त्यात सर्रास रेतीचा भराव होत आहे. कोट्यवधीची मौल्यवान रेती कायमस्वरूपी भूगर्भात काढली जात आहे. विदेशात भरावासाठी रेतीला पर्याय शोधण्यात आला आहे.रेतीऐवजी भरावात फ्लॅय अ‍ॅशचा तथा सीसीआरचा वापर करण्याची गरज आहे. उड्डाणपूलात भराव म्हणून फ्लॅय अ‍ॅशला केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. उड्डाण पुलावर दररोज शेकडो ट्रकची वाहतूक सुरू असताना फ्लॅय अ‍ॅश जागा सोडत नसल्याचा दावा केला जातो. त्यामुळे मॅग्नीज खाणीत दरड कोसळू नये म्हणून सुरक्षेसाठी रेतीऐवजी फ्लॅय अ‍ॅश उत्तम पर्याय होवू शकतो. एकीकडे रेतीचे भाव गगणाला भिडले आहेत. रेती मिळणे कठीण झाले आहे. पर्यावरणाचेही नुकसान रेती उत्खननाने होत आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारने पर्याय शोधण्याची गरज आहे. परंतु सध्यातरी मौल्यवान रेती भूगर्भात गडप होत असल्याचे दिसून येत आहे.बावनथडीत खड्डेच खड्डेबावनथडी नदीपात्रात मॉयल प्रशासनाला रेती उत्खननाची परवानगी देण्यात आली. परंतु नेमकी कोणत्या गटातून परवानगी दिली हे मात्र गुलदस्त्यात आहे. जेथे रेती उपलब्ध आहे तेथूनच थेट उत्खनन केले जाते. महसूल प्रशासन व खनिकर्म विभाग याकडे कायम दुर्लक्ष करते. केंद्र सरकारच्या खाणी असल्याने राज्य सरकारचा महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जाते. यामुळे बावनथडीच्या पात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले असून नदीत रेती नावापुरतीच शिल्लक आहे. ही पर्यावरणासाठी धोक्याची घंटा आहे. अलिकडे तहसीलदार राजेंद्र बालपांडे यांनी मॉयल प्रशासनाला जेसीबीने उत्खनन करू नये असे निर्देश दिले. मात्र आता रेतीऐवजी फ्लॅय अ‍ॅशचा पर्याय स्विकारण्याची आवश्यकता आहे.