शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

जिल्ह्यातील शहीदांना वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

पोलीस अधीक्षक वसंत जाधव म्हणाले, आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातून एकुण २६८ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावीत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली आहे. त्यांना शतश: वंदन असे बोलून शहीद पोलीसांच्या स्मृतिंना उजाळा दिला.

ठळक मुद्देभंडारा येथे पोलीस हुतात्मा दिवस : ३० फैरी झाडून पोलीस मुख्यालयात दिली मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कभंंडारा : कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ ऑक्टोबर हा पोलीस हुताम्या स्मृती दिवस म्हणुन पाळला जातो. त्यानिमित्ताने बुधवारला पोलीस मुख्यालयातपोलीस हुतात्मा स्मारक स्मृतिस्तभं येथे सकाळी ८ वाजता श्रध्दांजली व शोक सलामीचे आयोजन करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, आर.पी. देशपांडे आदी उपस्थित होते.यावेळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव म्हणाले, आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातून एकुण २६८ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावीत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली आहे. त्यांना शतश: वंदन असे बोलून शहीद पोलीसांच्या स्मृतिंना उजाळा दिला. तसेच २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लद्दाख हद्दीत भारत तिबेट सीमेवर १६ हजार फुट उंचावर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० शिपाई गस्त घालत असताना हिंदी-चिनी भाई भाई असा नारा लावणाऱ्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. याची चाहूल लागताच सीमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रे असल्याची पर्वा न करता जवानांनी मातृभूमीसाठी प्राणपणाने लढून हौतात्म्य पत्करले.त्यांच्यावर पोलिस इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडली. त्या हॉट्रस्प्रिंग येथे या वीरांचे स्मारक उभारले आहे. तेव्हापासून हा दिवस पोलिस हुतात्मादिन/ पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. तेथे संपूर्ण भारतातील पोलीसांनी या विराचे स्मारक उभारले आहेत. स्मारकावर शब्द अंकीत आहेत. सदर प्रसंगी पोलीस अधिक्षक वसंत जाधव व अपर पोलीस अनिकेत भारती, रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी पोलीस उपअधिक्षक देशपांडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली.अग्नीशस्त्राद्वारे ३० काडतूसांच्या फैरी झाडून शोक सलामी देण्यात आली. तसेच पोलीस बॅन्ड पथक यांनी राष्ट्रभक्तीपर गितांच्या धुन वाजवुन श्रध्दांजली अर्पण केली. ह्यपोलीस हा समाजातील एकमेव घटक आहे. जो दिवस रात्र आपल्यासाठी सज्ज असतो. १५ ऑगस्ट १९४९ पासुन शहीद झालेल्या सर्व शूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली.सदर प्रसंगी कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या शहीदांची नावे रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी यांनी वाचन केले तसेच भंडारा जिल्ह्यातील शहीद पोलीस अधिकारी/कर्मचारी पोलीस उपनिरिक्षक दिपक सखराम रहिले, पोलीस हवालदार योगेश्वर हेडावू, पोलीस शिपाई शिवलाल बरैया, पोलीस शिपाई दामोधर वडतकर, रविकुमार जौंजाळ, ईशांतकुमार भुरे, भोजराज शंकर बांभरे, मुलचंद भोयर, मनोज गिऱ्हेपुंजे, पोलीस हवालदार . विश्वनाथ बोरकर, पोलीस शिपाई जयपाल शेळके, स.फौ. शराफा हुसैन पठाण, पो.हवा. सुनिल मेश्राम यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हातील शहिद अधिकारी व कर्मचारी यांचे कुटूंबीय सदर कार्यक्रमात उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक मानकर, पोलीस निरिक्षक स्थागुशाखेचे गजानन कंकाळे, बन्सोडे, ताजणे, चंद्रशेखर चकाटे, पाटील, क्रिष्णा हत्तीमारे, गायकवाड, पवार, कतलाम, प्रशांत मिसाळे, तुरकुडे, माळी, वर्मा, पवनसिंग, सर्व शाखेचे, पोलीस मुख्यालय येथील कर्मचारी तसेच पोलीसांचे कुटूंबिय हजर होते.

टॅग्स :Policeपोलिस