शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

वज्राघातापासून बचाव आवश्यक

By admin | Updated: June 23, 2017 00:25 IST

जिल्हयात मागील काही वषार्पासून वज्राघाताचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये

सतर्कता हवी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा जनजागृतीसाठी पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हयात मागील काही वषार्पासून वज्राघाताचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने जागृती व्हावी व वज्राघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करु नये या विषयी सावधानता बाळगण्यासाठी काळजी याप्रमाणे घ्यावी.पावसाळयाच्या दिवसात शेतात असतांना शेता जवळील घराचा त्वरीत आसरा घ्यावा. पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर या. झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे रहा. ओल्या शेतात रोप लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्ती अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्ती यांनी तात्काळ कोरडया व सुरक्षित ठिकाणी जावे. शेतात काम करीता असाल तर सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला नेसल तर शक्यतो जिथे आहात तिथेच रहा. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपट अशा वस्तु अथवा कोरडा पाला पाचोडा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेवू नका. धातूपासून बनलेल्या वस्तु जसे कृषि यंत्रा पासून दुर रहा. गाव, शेत, आवार, बाग-बगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कुंपन घालू नका. ते विजेला सहजतेने आकर्षित करतो. धातुची दांडीमुठ असलेल्या छत्रीचा उपयोग करु नका. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका, झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच जागेवर, झाडावर चढू नका. वीज वाहक वस्तूपासून दूर राहा उदा. रेडीयेटर, मेटल, लोखंडी पाईप, विद्युत उपकरणे बंद ठेवा. शक्यतो घरातच रहा. पाण्याचे नळ, फ्रिज टेलिफोन, मोबाईल यांना स्पर्श करु नका. त्यापासून दूर रहा आणि विजेवर चालणाऱ्या यंत्रापासूनही दूर रहा. कपडे वाळविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचा वापर करा. तारेचा वापर करु नका. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपआपल्या घरी वीज अटकाव यंत्रणा बसवावी. टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन, टेलिव्हिजन टॉवर यापासून दूर रहा. प्लग जोडलेले विद्युत उपकरणे हाताळू नका तथा दूरध्वनीचा अथवा मोबाईलचा वापर करुन नका. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशा वेळी वाहनातून प्रवास करु नये. चारचाकी वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनात रहावे. वाहनाच्या बाहेर थांबावे आवश्यक असल्यास, धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नका. वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा. मोकळया आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा. एकाच वेळी जास्त व्यक्ती एकत्र राहू नका, दोन व्यक्तीमधील अंतर किमान १५ फूट असावा. सावधानता बाळगल्यास जिवीत हानी होणार नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी कळविले आहे.