बाॅक्स
गर्भवती मातांसाठी आजपासून लसीकरण
गर्भवती मातांसाठी जिल्ह्यात बुधवार, २१ जुलैपासून लसीकरण माेहीम हाती घेतली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे. गर्भवती मातांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आराेग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
बाॅक्स
४८३५ व्यक्तींचे सशुल्क लसीकरण
मार्च व एप्रिल या महिन्यांत जिल्ह्यातील ४८३५ व्यक्तींनी सशुल्क लसीकरण केले आहे. शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांत २५० रुपये शुल्क देऊन लसीकरण करण्यात आले. मात्र मे महिन्यापासून सशुल्क लसीकरण बंद आहे.
बाॅक्स
चार लाख ९६ हजार ६६८ व्यक्तींचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ९६ हजार ६६८ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात पहिला डाेस घेणारे तीन लाख ७२ हजार ६९, तर दुसरा डाेस घेणाऱ्या १ लाख २४ हजार ६१७ व्यक्ती आहेत. यामध्ये दाेन लाख ४८ हजार ५१५ पुरुष आणि दाेन लाख ४८ हजार १२२ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात दाेन लाख ८४ हजार १४५ व्यक्तींना काेविशिल्डचे डाेस, तर दाेन लाख १२ हजार ५३१ व्यक्तींना काेव्हॅक्सिनचे डाेस देण्यात आले आहेत.
बाॅक्स
दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या अल्प
काेराेना लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतर दुसरा डाेस घेण्यास नागरिक उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पहिला डाेस घेतलेल्या चार लाख ९६ हजार ६६८ व्यक्तींपैकी केवळ एक लाख २४ हजार ६१७ व्यक्तींनीच लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने दुसऱ्या डाेससाठी विशेष शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. नागरिकांनी लवकरात लवकर दुसरा डाेस घ्यावा, यासाठी जनजागृती केली जात आहे.