शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी, जमावबंदी व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे. त्यानुसार गावपातळीपासून ते नागरी व शहरी भागातदेखील ही यंत्रणा अहोरात्र राबतांना दिसत आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तब्बल ३५ रिक्त कर्मचाºयांविना सात उपकेंद्र व २५ गावांतील नागरिकांची आरोग्य सुविधा पुरवितांना कार्यरत अधिकारी कर्मचाºयांची एकच धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकोरोनावर मात करण्यासाठी जिकरीचे प्रयत्न, सात उपकेंद्र व २५ गावांतील नागरिकांची आरोग्य सुविधा पुरवितांना धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कोरोना विषाणूच्या संकटकालिन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेकडून प्रतीबंधात्मक उपाययोजना म्हणून तोकड्या अधिकारी कर्मचारी संख्येतही जिकरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल ३५ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याची खळबळजनक माहिती असून आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी, जमावबंदी व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे. त्यानुसार गावपातळीपासून ते नागरी व शहरी भागातदेखील ही यंत्रणा अहोरात्र राबतांना दिसत आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तब्बल ३५ रिक्त कर्मचाऱ्यांविना सात उपकेंद्र व २५ गावांतील नागरिकांची आरोग्य सुविधा पुरवितांना कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे.२५ गावांचा समावेश असलेल्या कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रत्येकी सात उपकेंद्र्र व आरोग्य वर्धिनी उपकेंद्र आहेत. त्यामध्ये कुडेगाव, किरमटी, मोहरणा, खैरी / पट, सोनी, मडेघाट व पुयार आदिंचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या नियमानुसार या उपकेंद्रात प्रत्येकी दोन आरोग्य सेविका व दोन आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आरोग्यवर्धिनी केंद्रात प्रत्येकी एका वैद्यकिय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. मात्र मागील अनेक दिवसापासून या केंद्राअंतर्गत येणाºया सात उपकेंद्रांमध्ये केवळ १४ पैकी ७ आरोग्य सेविका, परिचारीका व १४ आरोग्य सेवकांपैकी केवळ चारच आरोग्य सेवक व केवळ एक वर्धिनी केंद्र वैद्यकिय अधिकारी कार्यरत असल्याची माहिती आहे. आरोग्य सेविका, परिचारीकांना मदतनिस म्हणून सातही उपकेंद्रात प्रत्येकी एक पद रिक्त आहे. तालुक्यातील खैरणा गावात आशा वर्करचे पद रिक्त असल्याची माहिती आहे.दरम्यान , कुडेगाव येथील उपकेंद्रात एका आरोग्य सेविकेची नियुक्ती असून त्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिण्यापूर्वीच रुजु देखील झाल्या आहेत. मात्र तोकड्या कर्मचाºयांअभावी या आरोग्य सेविकेने उपकेंद्राचे दार देखील उघडले नसल्याची वास्तव चर्चा गावकºयांत आहे.सुविधांचा अभावशासन प्रशासनाकडून गावागावांत आरोग्य सोयीसुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या दवाखान्यामध्ये अधिकारी, कर्मचाºयांची पदे रिक्त असून सुविधांचा वाणवा दिसून येत आहे.कुडेगाव आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दीकुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील औषध निर्माण अधिकारी १ , ओपीडी आरोग्य सेविका १ , परिचर २ , मुख्य आरोग्य सेविका १ असे एकुण पाच पदे रिक्त आहेत. सध्या सर्वत्रच कोरोना विषाणुची दहशत असून सर्वसाधारण सर्दी , खोकला व ताप अशी लक्षणे आढळून आल्यास सबंधितांवर प्राथमिक आरोग्य तपासणी व औषधोपचार करतांना देखील येथील अधिकारी कर्मचाºयांची तारांबळ उडतांना दिसून येत आहे.