शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारात कीड लागलेल्या धान्याचा वापर

By admin | Updated: July 23, 2016 01:09 IST

तालुक्यातील ढोरवाडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात कीड लागलेल्या धान्याचा विद्यार्थ्यांना आहार देणे सुरु आहे.

ढोरवाडा येथील प्रकार : तांदूळ व वटाण्यांचा समावेश, शाळेला कुलूप ठोकणार तुमसर : तालुक्यातील ढोरवाडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात कीड लागलेल्या धान्याचा विद्यार्थ्यांना आहार देणे सुरु आहे. पोषण आहाराची चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांना धान्य कमी आढळले. या प्रकरणात १८०० रुपयांचा दंड मुख्याध्यापिकेवर ठोठावण्यात आला. सोमवारपर्यंत मुख्याध्यापिकेचे स्थानांतरण न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पं.स. सदस्य तथा ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांनी दिला आहे. आमचा गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय ढोरवाडा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. या बैठकीत पं.स. सदस्या मंगला कनपटे, सरपंच ग्यानीराम बुध्दे, उपसरपंच आसाराम खंगार, ग्रा. पं. सदस्य दिलीप बोंदरेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील पोषण आहार संदर्भात निकृष्ठ आहार व गुरुपौर्णिमेला शाळेत शालेय पोषणआहार शिजविला नाही. परंतु शालेय दस्तऐवजात नोंद प्रकरणी चौकशीकरिता शालेय पोषण आहार योजनेचे अधीक्षक जयप्रकाश जिभकाटे गुरुवारी आले होते. यात किड लागलले वटाणे तथा तांदळाच्या गोल गाठी झालेल्या आढळल्या. सुमारे २५ किलोग्रॅम वटाणांचा त्यात समावेश होता. शाळेत पुरेसे धान्य उपलब्ध नव्हते. भाजीत आंब्याच्या वाळलेल्या फोडी घालण्यात येतात अशा तक्रारी पदाधिकारी, पालकांनी केल्या. खाण्यायोग्य नसलेल्या वटाण्याचे बेसन करुन विद्यार्थ्यांना देण्यात येते. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रकरणाची खंडविकास अधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली, परंतु काहीच कारवाई झाली नाही. मुख्याध्यापिका सुधा पटले ह्या नागपूरवरुन ये-जा करतात. पदाधिकाऱ्यांशी असभ्य बोलतात अशी तक्रार करण्यात आली. या शाळेत १ ते ७ पर्यंत १०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पंचायत समितीचे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष याकरिता कारणीभूत आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. निवेदनावर पंचायत समिती सदस्या मंगला कनपटे, शाळा समिती अध्यक्ष नानाजी बुधे, उपाध्यक्ष रत्नमाला बिल्लोटे, सदस्य रुपाली भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण बुध्दे, तारासन गाढवे, अनिता बुध्दे, नलु खंगार सह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)