शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारितेचा उपयोग समाज विकासासाठी

By admin | Updated: February 14, 2017 00:24 IST

ग्रामीण भागातील जनतेचा अतूट विश्वास असल्याने जनतेच्या अतूट विश्वासाला तडा न जाऊ देता ...

पत्रकार संमेलन : वसंत एंचीलवार याचे प्रतिपादन लाखांदूर : ग्रामीण भागातील जनतेचा अतूट विश्वास असल्याने जनतेच्या अतूट विश्वासाला तडा न जाऊ देता पत्रकारांनी निष्पक्ष, निस्वार्थ, निधर्मी लेखणी करून पत्रकारितेचा उपयोग समाजविकासासाठी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा परिषद भंडाराचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अ‍ॅड. वसंत एंचीलवार यांनी केले.लाखांदूर येथे आयोजित विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय पत्रकार संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विदर्भ ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा भंडाराच्या वतीने लाखांदूर येथे जिल्हास्तरीय पत्रकार सम्मेलन तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. उदघाटन संपादक निशांत कांबळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य मनोहर राऊत, जि.प.सदस्य प्रदीप बुराडे, नगर पंचायतचे गट नेते रामचंद्र राऊत, पं.स.सदस्य शिवाजी देशकर, पं.स.सदस्य गुलाब कापसे, काँगेसचे जिल्हा महासचिव अधिवक्ता धम्मदीप रंगारी, भाजपा तालुकाध्यक्ष नूतन कांबळे, महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रियंक बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील भोवते, संचालक मुकेश भैय्या, संचालक तेजराम दिवठे, संपादक मनोहर मेश्राम उपस्थित होते.प्रास्ताविक विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष निशाद लांजेवार यांनी केले. त्यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा मांडत असतांना ग्रामीण भागातील पत्रकारांना योग्य न्याय देण्यासाठी लढा उभा करणार असल्याचे सांगितले. मनोहर राऊत यांनी पत्रकारांना महाभारतातील संजयची उपमा देत दूरदृष्टी ठेऊन पत्रकारिता करावी जेणेकरून समाज घडेल.समाजातील दुर्लक्षित घटकाला न्याय मिळेल.असे प्रतिपादन केले. जि.प.सदस्य प्रदीप बुराडे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. गटातटाचे राजकारण न करता निष्पक्ष पत्रकारिता करावी असे आवाहन केले. निशांत कांबळे यांनी ग्रामीण पत्रकारांवर अनेकवेळा अन्याय होत असतो. ज्यांच्यासाठी पत्रकार निष्काम सेवा करण्याचा प्रयत्न करतो. मात्र एखाद्या पत्रकारावर संकट आले तर तेच मानसं साथ देत नाही अशावेळी पत्रकारांची संघटना मदतीला धाऊन येतो. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात संपादक निशांत कांबळे, वसंत एंचीलवार, जि.प.सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, गटनेते रामचंद्र राऊत, शिवाजी देशकर, गुलाब कापसे, नूतन कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक सुनील भोवते, मुकेश भैय्या, तेजराम दिवठे, देविदास राऊत, उर्मिला राऊत, धम्मदीप रंगारी, प्रियंक बोरकर,संपादक मनोहर मेश्राम यांचा समावेश होता. संमेलनाला जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.संचालन जितेंद्र ढोरे यांनी तर आभार नरेंद्र रामटेके यांनी केले. कार्यक्रमासाठी पावन समरत, स्वप्नील ठेंगरी, हेमंत मेश्राम, पुरुषोत्तम माकडे, ईश्वर कुंभलवार, नरेश सोनटक्के यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)