शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

राजेंद्र वॉर्डातील झोपडपट्टीत मूलभूत सुविधांची वाणवा

By admin | Updated: June 20, 2015 01:14 IST

शहरातील राजेंद्र वॉर्डात असलेल्या झोपडपट्टीत मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नागरिक झाले त्रस्तभंडारा : शहरातील राजेंद्र वॉर्डात असलेल्या झोपडपट्टीत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, पथदिवे, रस्ता तथा नाल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी समस्या सोसविण्याकडे दुर्लक्ष केल्यास नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशाराही येथील रहिवाशांनी दिला आहे.शुक्रवारी परिसरातील राजेंद्र वॉर्डातील बजाज मेटलच्या मागील परिसरात झोपडपट्टी आहे. दोन दशकांपासून रहिवास असलेल्या या झोपडपट्टीत मुलभूत सुविधांची वानवा आहे. या झोपडपट्टीत २०० नागरिकांचा रहिवास आहे. या परिसरात एक बोरवेल असून दोन सार्वजनिक नळ आहेत. रस्ता असला तरी त्याचे खडीकरणही करण्यात आले नाही. उन्हाळयाच्या दिवसात या भागात पाणीटंचाई भासत असल्याने नागरिकांची ही मागणी आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नालीचे बांधकामच नसल्याने त्यावर आच्छादन घालण्याचा प्रश्नच उदभवत नाही. डासांची प्रादुर्भाव वाढत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. कचरापेट्याही नाहीत. या वॉर्डात कचरा व्यवस्थापनेची व्यवस्था होणे गरजेचे आहे. परिणामी येथील लोकांना कचरा मोठ्या उघड्यावर फेकावा लागतो. काही ठिकाणी बोरवेल तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नाल्यांच्या बाबतीत स्थिती अत्यंत वाईट आहे. पथदिव्यांची सुविधाही तितकीच भयावह आहे. बजाज मेटलच्या गल्लीतून रात्रीदरम्यान ये-जा करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. याचा सर्वात मोठा फटका महिला व मुलींना बसत आहे. मागील महिन्यात जेसीबीद्वारा नाली खोदण्यात आली. त्या नालीमध्ये आता दोन ते तीन फुट पाणी साचले आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात खोलगट भागात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप येते. परिणामी विषारी श्वापदांच्या अस्तित्वामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नगरपरिषदेतर्फे येथे घरकुल बांधकाम सुरू आहे. परंतु गरीबांना डावलण्याचे काम येथे झाले आहे. राजेंद्र वॉर्डातही घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी आहे. झोपडपट्टीला लागून आयएमए हॉलजवळ मागीलवर्षी डांबरीरस्ता मंजुर करून त्याचे बांधकामही करण्यात आले. मात्र झोपडपट्टीत जाण्यासाठी डांबरीकरणयुक्त रस्ता तयार करण्यात आला नाही. नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देवून नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जनशक्ती भ्रष्टाचार समस्या निवारण संघटना महाराष्ट्र शाखा भंडारा व झोडपट्टी येथील नागरिकांनी केली आहे. निवेदनात जवळपास ३१ जणांच्या स्वाक्षऱ्या नमूद आहेत. (प्रतिनिधी)