शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बिनाखीत रोहयोची मजुरी अडली

By admin | Updated: December 16, 2014 22:47 IST

बिनाखी येथे रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या पांदन रस्त्याचे माती कामाची मजुरी अद्याप मजुरांना मिळाली नाही. या शिवाय शौचालयाचे अनुदान प्राप्त झाले नसल्याने रोष पसरला आहे.

चुल्हाड (सिहोरा) : बिनाखी येथे रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या पांदन रस्त्याचे माती कामाची मजुरी अद्याप मजुरांना मिळाली नाही. या शिवाय शौचालयाचे अनुदान प्राप्त झाले नसल्याने रोष पसरला आहे.बिनाखी ते गोंडीटोला गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे रोहयो अंतर्गत माती काम एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आले आहे. या माती कामावर १५० मंजूर कार्यरत होते. मजुरांपैकी ११८ मजुरांना अद्याप मजुरी मिळाली नाही. ८ महिन्याचा कालावधी पूर्ण होत असताना रोहयो विभाग तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगत आहेत. मजुरी प्राप्त करण्यासाठी मजूर तालुका कार्यालयात हेलपाट्या मारत आहेत. परंतु अद्याप मजुरी वाटपाचा मार्ग काढण्यात आलेला नाही. दरम्यान गावात मजुरी वाटपात विलंब होत असल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी तथा रोजगार सेवकाला धारेवर घेतले जात आहेत. या कारणावरून गावात तू तू मै मै वाढली आहे. मजुराची समस्या निकाली काढण्यासाठी पदाधिकारी आणि रोजगार सेवक यांची रोज रोहयो विभागात धाव घेत आहेत. परंतु तोडगा निघत नाही. यंत्रणेच्या निष्क्रीयतेमुळे मजुरांना न्याय मिळत नाही असा आरोप मजूर करीत आहेत. गावात निर्मल भारत योजनेअंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात आली आहेत. या शौचालयाचे अनुदान रोहयोच्या निर्धात करण्यात आले आहे. परंतु रोहयो अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आले नाही. अल्प अनुदान राशीत शौचालय बांधकाम होत नाही. हे बांधकाम पूर्ण करताना अधिक राशीची गुंतवणूक लाभार्थी करीत आहेत. काही लाभार्थी उसणवारीवर साहित्य आणि पैशाची जुळवाजुळव करीत आहे. गावात अशा २५ लाभार्थ्यांना शौचालयाचा अनुदान प्राप्त झालेला नाही. अन्य गावात हीच स्थिती आहे. यावरुन लाभार्थ्यांना दाग दागिने गहाण ठेवून उसणवारीचे पैसे द्यावे काय? असा सवाल लाभार्थी करीत आहेत. लाभार्थी आणि मजुरांना तात्काळ अनुदान राशी वाटप करण्याची मागणी सरपंच लिलाधर किरणापुरे, उपसरपंच देवेंद्र मेश्राम तथा तंमुसचे अध्यक्ष राजेंद्र बघेले व गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)