शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: September 7, 2015 00:46 IST

कारखाना आजारी दाखवून सुमारे २५०० हजार कामगारांना बेरोजगार करण्याचे षड्यंत्र युनिव्हर्सल फेरो कारखान्याने बीआयएफआर बोर्डासमोर केले.

युनिव्हर्सल कारखाना बंद : बीआयएफआर बोर्डाने फटकारलेतुमसर : कारखाना आजारी दाखवून सुमारे २५०० हजार कामगारांना बेरोजगार करण्याचे षड्यंत्र युनिव्हर्सल फेरो कारखान्याने बीआयएफआर बोर्डासमोर केले. बोर्डाने कारखाना आजारी उद्योगाच्या श्रेणीत येत नाही, असा निर्वाळा देऊन कारखाना पूर्ववत सुरु करा, असे निर्देश दिले. कारखान्यावर १३८ कोटींचे वीज बिल थकीत होते. बी.आय.एफ.आर. बोर्डाने माफ करून ४६ कोटी २० लक्ष २४ हजार ३८० रुपये केले. कंपनी व्यवस्थापनाने ३१५ कामगारांचे ‘क्लोजर नोटीस’ प्रकरणाच्या निकालानंतर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.तुमसरजवळील ‘युनिव्हर्सल फेरो अँड अलाईड केमिकल लिमिटेड’ मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना आहे. सन १९९८ मध्ये कंपनी व्यवस्थापनाने कारखाना आजारी आहे, या यादीत घातला. १७ वर्षापासून हा कारखाना बंदच आहे. सुमारे २५०० कामगार येथे बेरोजगार झाले. मानेकनगर (माडगी) येथील शेतकऱ्यांकडून जमिनीचे विक्रीपत्र करून कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले होते. मात्र व्यवस्थापनाने क्लोजर तथा स्वेच्छानिवृत्ती देऊन प्रथम ८०० व नंतर ३१५ कामगारांना सेवेतून काढले. कामगारांनी नंतर प्रकरण न्यायालयात दाखल केले. कंपनी व्यवस्थापनानेही न्यायालयात प्रकरण दाखल केले. दिल्ली येथील बी.आय.एफ.आर. (बोर्ड आॅफ फायनान्शियल रिकन्ट्रक्शन) येथे याचिका दाखल केली. बोर्डाचे अध्यक्ष बी.एस. मीना तथा सदस्य जे.पी. दुआ यांनी १२ डिसेंबर २०१४ ला कारखाना प्रबंधकांना युनिव्हर्सल फेरो अँड अलाईड केमिकल्स लिमिटेड कारखाना आजारी उद्योगांतर्गत येत नाही. त्यामुळे कारखाना पूर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले. वीज वितरण कंपनीचे कारखान्याकडे सुमारे १३८ कोटी वीज बिल थकीत होते. ते माफ करून ४६ कोटी २० लक्ष २४ हजार ३८० रुपये करण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाने ही रक्कम भरली. वीज वितरण कंपनीने न थकीत प्रमाणपत्र २५ मार्च २०१४ ला दिले. कंपनी व्यवस्थापनाने बी.आय.एफ.आर. बोर्डाला आश्वासन दिले की, ३१५ कामगारांना क्लोजर नोटीस अंतर्गत बरखास्त केले होते. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे. १५ आॅगस्टला माडगी येथील ग्रामसभेत प्रस्ताव घेऊन निर्णय मंजूर करण्यात आला की, कारखाना तत्काळ सुरु करण्याकरिता भारतीय मजदूर संघाने त्याकरिता प्रयत्न करावे. तसेच एका महिन्यात कंपनी व्यवस्थापनाने मजदूर संघ प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात यावी. या कारखाना परिसरात एकाच ग्रुपचा दुसरा कारखाना आहे. त्याचा याचा परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रीय मजदूर मंचचे अध्यक्ष हरिहर मलीक यांनी या संदर्भात राज्याचे कामगार मंत्री, खासदार नाना पटोले, आ.चरण वाघमारे यांचेकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)