शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नियमाला डावलून रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:10 IST

देवनारा रेती घाटातून केवळ १७०० ब्रास रेती उत्खननाची परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत ७०० ते ८०० ब्रास रेती उत्खनन करण्यात आली. ३० सप्टेंबरपर्यंत रेती उत्खनन सुरू राहणार आहे.सध्या नदी पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू आहे.

ठळक मुद्देदेवनारा रेतीघाटातील प्रकार : १७०० पैकी केवळ ७०० ते ८०० ब्रास रेतीचे खणन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देवनारा रेती घाटातून केवळ १७०० ब्रास रेती उत्खननाची परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत ७०० ते ८०० ब्रास रेती उत्खनन करण्यात आली. ३० सप्टेंबरपर्यंत रेती उत्खनन सुरू राहणार आहे.सध्या नदी पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे रेती उत्खनन नियमाला येथे डावलले जात आहे.४ जानेवारी २०१८ च्या जीआरनुसार ३ हजार ब्रासपर्यंतच्या परिणामाच्या रेतीघाटाचे लिलाव ३ महिने राहणार आहे. देवणारा रेतीघाट मागील वर्षी लिलाव झाल्याने येथे महसूल व खनिकर्म विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.तुमसर तालुक्यातील देवनारा रेती घाट सन २०१७ मध्ये लिलाव करण्यात आला होता. नदीपात्रात रेतीसाठा कमी असल्याने खनिकर्म विभागाने केवळ १७०० ब्रास रेती उत्खननाची परवानगी येथे दिली होती. त्या अनुषंगाने महसूल विभागाने रेती घाट लिलाव प्रक्रिया राबविली. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर बावनथडी नदी आहे.नदी पात्रात दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित केल्या आहेत. खनिकर्म विभागाने तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून १७०० ब्रास रेती उत्खननाची परवानगी दिली. रेती उत्खननामुळे नदी पात्रात खड्डे पडले दगड दिसत आहेत.देवनारा येथील रेतीघाटावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येईल. तसा अहवाल तयार करण्यात येईल. रेती उत्खनन करण्याचे नियम आहेत. त्याची प्रत्यक्ष चौकशी करण्यात येईल. जिल्हा खनिकर्म अधिकाºयांशी याबाबत माझी चर्चा झाली आहे.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.