शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
6
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
7
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
8
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
9
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
10
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
11
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
12
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
13
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
14
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
15
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
16
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
17
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
18
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
19
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
20
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल

देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावरील ‘यू-टर्न’ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 21:50 IST

रस्ते सरळ असावेत, वळणमार्ग शक्यतो सरळ करावे असा रस्ते महामार्ग खात्याचा नियम आहे, परंतु तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पोचमार्गाला जोडणारा रस्ता यु-टर्न करण्यात आला आहे. खापाकडून देव्हाडी रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेक वाहने रेल्वे फाटक मार्गाऐवजी देव्हाडी गावातील अंडरपास मधून जातात. त्यांना रेल्वे फाटकाचा रस्ता दिसत नाही. तुमसर-खापा-गोंदिया रस्त्याचा फलक सुध्दा येथे लावण्यता आला नाही. नियमांना येथे बगल देण्यात आली आहे.

ठळक मुद्देतुमसर-खापा- देव्हाडी-गोंदिया रस्त्याचा संगम : अंधारात होतेय वाहनचालकांची तारांबळ

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्ते सरळ असावेत, वळणमार्ग शक्यतो सरळ करावे असा रस्ते महामार्ग खात्याचा नियम आहे, परंतु तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पोचमार्गाला जोडणारा रस्ता यु-टर्न करण्यात आला आहे. खापाकडून देव्हाडी रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेक वाहने रेल्वे फाटक मार्गाऐवजी देव्हाडी गावातील अंडरपास मधून जातात. त्यांना रेल्वे फाटकाचा रस्ता दिसत नाही. तुमसर-खापा-गोंदिया रस्त्याचा फलक सुध्दा येथे लावण्यता आला नाही. नियमांना येथे बगल देण्यात आली आहे.मनसर -तुमसर-गोंदिया असा नव्याने राष्ट्रीय महामार्गाची घोषणा नुकतीच करण्यात आली. राष्ट्रीय मार्गाचे काम जोमात सुरु आहे. प्रथम चरणात रस्त्यावरील लहान-मोठी पुलांची कामे करणे सुरु आहे. देव्हाडी उड्डाणपूलाच्या सुरुवातीला तुमसर- खापा-देव्हाडी असा त्रिकोणात रस्ता आहे. उड्डापूलावजळ यू-टर्न घेण्यात आला आहे. खापा मार्गाने येणाऱ्या वाहनांना देव्हाडी रेल्वे फाटक (गोंदिया) मार्ग दिसत नाही. ती वाहने देव्हाडी रेल्वे स्थानकाकडे वळविण्यात येतात. पुढे गेल्यावर चुक लक्षात येते. ती वाहने देव्हाडी अंडरपास मार्गाने रेल्वे फाटकाकडे वळवितात. अंडरपासमधून वाहने बाहेर पडतांना धोका आहे. महामार्गावरील वाहने येथून भरधाव जातात.यू-टर्न घेतांनी वाहनांना धोक्याची शक्यता आहे. अनेक लहान-मोठे येथे वाहनांना अपघात झाले आहेत. रात्री येथे लाईटची सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे नवीन वाहन चालकांना पुढे कुठे जावे असा प्रश्न पडतो. चार रस्ते येथे असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने दूचाकी स्लिप होण्याच्या अनेक घटना येथे घडल्या. किमान रेल्वे मार्ग दर्शविणारे फलक संबंधित विभागाने येथे लावण्याची गरज आहे. राष्टÑीय महामार्गाचे काम खापा रस्त्यावर हाकेच्या अंतरावर सुरु आहे. वाहनचालकांची रात्री तारांबळ उडते. यू-टर्न रस्ता बांधकाम करतांनी किमान पलीकडे जाताना दिशा निर्देशक फलक लावण्याची गरज होती. स्थापत्य अभियंत्यांनी यु-टर्न रस्त्याला मंजूरी कशी दिली. हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.यू-टर्न नंतर उड्डाणपूल पोचमार्ग खड्डेमय आहे. त्यामुळे वाहनचालकांना येथे वाहने चालवितांनी तारेवरची कसरत करावी लागते. अनेक नियम व कायदे असतांना त्याची अंमलबजावणी कुणी करावी असा प्रश्न येथे पडला आहे. प्रशासनात केवळ कागदी घोडे नाचवली जातात काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.देव्हाडी येथील उड्डाणपूल प्रवेशमार्ग यू-टर्न आहे. चार रस्त्याची गर्दी असून रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता सहजासहजी दिसत नाही. यू-टर्न रस्त्याला मंजुरी देतांनी तांत्रिक बाबी तपासणी करणे गरजेचे होते. किमान येथे रात्री लाईटची व्यवस्था करुन रस्त्याचे फलक लावण्याची गरज आहे.- विपील कुंभारे, महासचिवभंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी तुमसर