शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तुकडोजी वॉर्ड परिसरातील प्रकार : पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे. नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभंडारा शहरात रस्त्यांसह नाल्यांची दूरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील तुकडोजी वॉर्डाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यासह पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे.नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.अनेक वषार्चा जुना सिंमेंटचा रस्ता असल्यामुळे रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे गिट्टीही उखडलेली आहे.याच परिसरात एलआयसी ऑफिस, मत्स्य कार्यालय, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, दुय्यम निबंधक तसेच पोलीस अधिक्षक, तहसील कार्यालय असल्याने येथे परिसरात नेहमीच वर्दळ असते.रस्त्यावरून पायदळ, सायकलस्वार, मोटारसायकल व चारचाकी वाहने सतत ये - जा करतात. यामुळे मोटार सायकलसह सायकलस्वारांना वाहने चालविणे कठीण झाले आहे.ज्या रस्त्यावरुन दिवसभरात काही वर्दळ नसते असे रस्त्येही सिमेंटचे बनविले आहेत. परंतु सततच्या रहदारीच्या मार्गावर विविध सुविधांपासून दुर्लक्षित असलेल्या या वार्डातील नागरिकांवर नगर परिषद प्रशासनाकडून अनेक वर्षापासून अन्याय होत आहे.अनेक वषार्पासून या रस्त्याचे दुसऱ्यांदा सिमेंटीकरणाचे काम होऊ शकले नाही, हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. तसेच येथील नाल्याही मागील कित्येक वर्षापासून मोडकळीला आल्या आहेत.अनेकदा पाणी या रस्त्यावरच साचलेले असते. येथे नळयोजना व नाल्यांची योग्य सोय नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत.हीच अवस्था सिव्हिल लाईन परिसराची झाली आहे. ‘अ’ वर्गाच्या दर्जाचे कर नगर परिषदेकडून वसूल केले जात असतांना सुविधा मात्र काहीच दिल्या जात नाही. या समस्याबाबत वारंवार तक्रारी देवून झाल्या परंतू तुकडोजी वाडार्तील एलआयसी ऑफिसमागील गल्लीची स्थिती अनेक वर्षापासून जैसे थे च आहे.जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांमध्ये नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान