शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
5
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
6
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
7
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
8
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
9
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
10
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
11
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
12
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
13
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
14
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
15
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
16
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
17
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
18
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
19
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
20
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

सिनेस्टाईल पाठलाग करून दारूसह २० लाखांचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:59 IST

पवनी तालुक्यातील भावड येथील परवानाधारक देशी दारू दुकानात आलेले साहित्य नऊ इसमांनी धाकाच्या आधारावर लुटून नेले.

ठळक मुद्देअड्याळ पोलिसांची कारवाई: इसम पळून जाण्यात यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील भावड येथील परवानाधारक देशी दारू दुकानात आलेले साहित्य नऊ इसमांनी धाकाच्या आधारावर लुटून नेले. यात पोलिसांनी समयसुचकता दाखवून सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून ट्रकसह एका इसमाला पकडले. यात २० लक्ष रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही घटना काल रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास भावळ येथील देशीदारू दुकानात ६२४ पेट्या भरून मिनी ट्रक क्रमांक एमएच ३५ / ११०६ चा चालक महेश रजवाडे हा तीन मजुर घेऊन रात्रीला भावड येथे पोहचला. परंतु दुकान बंद असल्याने रात्र झाल्याने गाडीतच झोपी गेले. यावेळी टाटा सुमोमध्ये नऊ इसम लुटण्याच्या इराद्याने आले.या इसमांनी मारहाण करून धाक दाखवून दारू भरलेला ट्रकच पळवून नेला. पोलीस स्टेशन अड्याळला रात्री ११ च्या सुमारास माहिती मिळताच रात्रीला पेट्रोलींगवर असणारे ए.एस.आय. जाधव, भोंगाडे, गिºहेपुंजे यांनी त्वरीत पवनी पोलीस स्टेशनला संपूर्ण माहिती कळविताच अड्याळ व पवनी परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.पोलिसांनी वेळ न घालवता सिनेस्टाईल पद्धतीने ट्रक व एका आरोपीला पाठलाग करून पकडले. नाकाबंदी दिसताच लुटारू वाहने ठेवून पसार झाले होते, हे येथे विशेष. निलज फाट्यावरून हा ट्रक ब्रम्हपुरीला जाणार असल्याची माहिती अड्याळ येथील ठाणेदार पिचक यांनी दिली.या प्रकरणात सहभागी असलेले अन्य इसम पसार होण्यास यशस्वी झाले. परंतु शुभम अर्पण रामटेके हा अडकला. यात पोलिसांनी तीन मोबाईल व २० लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत किचक हे करीत आहेत.पवनी तालुक्याच्या सिमेलगत चंद्रपूर जिल्ह्याची सिमा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातून दारूची निर्यात केली जाते. चोरी, छुप्या मार्गाने हा व्यवसाय केला जातो. यात अन्य जिल्ह्यातील तरूणांचाही सहभाग असल्याची विश्वसनीय माहिती आहे.