लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साकोली येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत १ कोटी ९२ लाख रुपयांची चोरी होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप चोरट्यांचा सुगावा लागला नाही. पोलीस यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असून तपासाला अद्यापही गती मिळाली नाही.साकोली येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत चोरी झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. चोरट्यांनी २४ लाख ५५ हजार रोख आणि चार किलो २०० ग्रॅम सोने लंपास केले होते. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी बँकेची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. बनावट चाबीने लॉकर उघडून ऐवज व रोख लंपास केला. घटना घडली त्यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी साकोलीत धाव घेतली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र कोणताही सुगावा हाती लागला नाही. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआर चोरुन नेला. त्यामुळे पोलीस तपासात मोठी अडचण निर्माण झाली.आता दोन दिवस झाले तरी या चोरी प्रकरणाचा कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस यंत्रणा सध्या निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असल्याने तपासाला गती मिळत नसल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपये चोरीस गेल्यानंतरही ज्या वेगाने तपास व्हायला हवा तसा येथे झाल्याचे दिसत नाही. स्थानिक पोलीस आणि जिल्हास्तरीय पोलिसांची विविध पथके असली तरी या चोरीच्या तपासाकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. निवडणूक आटोपल्यानंतरच या चोरीच्या खºया तपासाला प्रारंभ होईल. मात्र तोपर्यंत ऐवज चोरट्यांना रफादफा करण्यास संधी मिळेल. विशेष म्हणजे लॉकर बनावट चाबीने उघडण्यात आले होते. त्या दृष्टीने ही तापास दिसत नाही.या चोरीने जिल्ह्यातील बँकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अद्यापही कोणत्याही बँकेने सुरक्षेबाबत खास उपाययोजना केल्याची माहिती नाही. ग्रामीण भागातील बँका असुरक्षित आहेत.
साकोलीत बँकेतील चोरीचा दोन दिवसानंतरही सुगावा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST
आता दोन दिवस झाले तरी या चोरी प्रकरणाचा कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस यंत्रणा सध्या निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असल्याने तपासाला गती मिळत नसल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपये चोरीस गेल्यानंतरही ज्या वेगाने तपास व्हायला हवा तसा येथे झाल्याचे दिसत नाही.
साकोलीत बँकेतील चोरीचा दोन दिवसानंतरही सुगावा नाही
ठळक मुद्देतपासात गती नाही : १ कोटी ९२ लाखांच्या चोरीचे प्रकरण