काशिवार यांच्या प्रयत्नांना यश : दोन गावांचा होणार विकाससाकोली : राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नवनिर्मित साकोली नगर परिषदेला आमदार बाळा काशिवार यांच्या प्रयत्नातून २ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे साकोली व सेंदूरवाफा या गावांच्या विकासासाठी मदत होणार आहे.आ.काशीवार यांच्या प्रयत्नाने साकोली व सेंदूरवाफा ही दोन गावे मिळून साकोली नगर परिषद अस्तित्वात आली. या नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरु असून प्रभागनिहाय व नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. मात्र निवडणुकी पूर्वीच आ.काशीवार यांनी दोन्ही गावांच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी रुपये मंजूर करून घेतले. साकोली व सेंदूरवाफावासीयांसाठी आनंदाची बाब आहे. हा निधी ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत खर्च करण्याची शासन निर्णयात निर्देश आहेत.ब्लड आॅन कॉल योजनेस मंजुरीराज्य शासनाने सुरू केलेल्या ‘ब्लड आॅन कॉल’ या योजनेअंतर्गत ४० कि.मी. पर्यंतच्या रूग्णास रक्त पुरवठा करण्यात येते. परंतु साकोली सेंदूरवाफा हे क्षेत्र भंडारा येथून ५० कि.मी. अंतरावर असल्याने ब्लड आॅन कॉलची सुविधा येथील जनतेला मिळणार नाही. ही बाब लक्षात येताच साकोली व सेंदुरवाफा येथे ब्लड आॅन कॉल मंजूर करण्यात आले. यासाठी त्यांनी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आरोग्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन साकोली सेंदूरवाफा या ग्रामीण भागात ४० कि.मी. ऐवजी ५० कि.मी. च्या परिसरात ब्लड आॅन कॉल योजनेअंतर्गत रक्त व रक्तघटक उपलब्ध करून देण्यास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नावीण्यपूर्ण योजनेतून साकोली नगर परिषदेला दोन कोटी मंजूर
By admin | Updated: October 14, 2016 00:29 IST