शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

समयसूचकतेमुळे फसला दोन मुलांच्या अपहरणाचा डाव

By admin | Updated: December 9, 2015 00:38 IST

आंगणवाडीसमोर उभा असलेल्या एका मुलाला अज्ञात अपहरणकर्त्यांनी दुचाकीवर बसवून फरार झाले.

तुमसर : आंगणवाडीसमोर उभा असलेल्या एका मुलाला अज्ञात अपहरणकर्त्यांनी दुचाकीवर बसवून फरार झाले. रस्त्यात दुचाकी थांबवून पुन्हा दुसऱ्या एका मुलाला बोलावले. त्या मुलाने नकार दिला. त्यामुळे दुचाकीस्वाराने त्याचा पाठलाग केला. प्रसंगावधान ओळखून दुचाकीवर बसलेल्या मुलाने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेतला. हाताची पकड सैल होताच त्या मुलाने गावाकडे धूम ठोकली. ही घटना देव्हाडी येथे मंगळवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तुमसर रोड (देव्हाडी) येथे आंबेडकर वॉर्डातील आंगणवाडीसमोर रोहीत मेश्राम (९) हा मुलगा उभा होता. इतक्यात एका दुचाकीवर दोन अज्ञात तरुण तिथे आले. त्यांच्या तोंडाला रूमाल बांधलेले होते. हाताच्या इशाऱ्याने त्यांनी रोहितला जवळ बोलाविले. रोहित त्यांच्याजवळ जाताच त्याला त्या तरुणांनी उचलून दुचाकीवर बसविले. त्यानंतर ते मांढळच्या दिशेने पसार झाले. मांढळ गावानजिकच्या रस्त्यावर काही लहान मुले खेळत होते. त्या मुलांना पाहून अपहरणकर्त्यांनी दुचाकी पुन्हा थांबविली. दुचाकीच्या मागील युवकाने रोहितचे तोंड दाबून ठेवले होते. खेळणाऱ्या मुलाला अपहरणकर्त्यांनी जवळ बोलाविले. तो मुलगा दुचाकीजवळ न येता तिथूनच पळाला. त्यामुळे दुचाकीवरील एका तरुणाने त्या मुलाचा पाठलाग केला, परंतु तो सापडला नाही.दरम्यान, रोहितने प्रसंगावधान ओळखून त्या तरुणांच्या हाताचा चावा घेतला. पकड सैल होताच रोहितने गावाच्या दिशेने धूम ठोकली. दोन्ही अपहरणकर्त्याने रोहितचा पाठलाग केला, परंतु गाव शिवारात लोकांना पाहून ते अपहरणकर्ते माघारी फिरले. रोहित घरी पोहोचल्यावर या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. पोलीस मित्र आलमखान, राजकुमार लिल्हारे, संजय अटराये, यांनी दुचाकीने गावाच्या तीन दिशेकडे जावून आरोपींचा शोध घेतला. परंतु त्यांना आरोपींचा सुगावा लागला नाही. त्यानंतर ते देव्हाडीत पोहोचल्यावर मेश्राम कुटुंबीयांनी याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरुन तुमसर पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यां दोन तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा तपास तुमसर पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)