शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्याजवळ अपघातात भुसावळचे दोन भाऊ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:45 IST

बोलेरो पीकअप वाहनाचे पंक्चर झालेले चाक बदलविताना समोरुन आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने भुसावळ येथील दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा नजिक भिलेवाडा येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली.

ठळक मुद्देपंक्चर चाक बदलविताना राष्ट्रीय महामार्गावर कारने दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बोलेरो पीकअप वाहनाचे पंक्चर झालेले चाक बदलविताना समोरुन आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने भुसावळ येथील दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा नजिक भिलेवाडा येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली.गुरुमीतसिंह बलराजसिंह बल (४०), जगरुत सिंह बलराजसिंह बल (३५) दोघे रा. जामनेर रोड बालाजी मार्बल भुसावळ जि.जळगाव अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे बिलासपूर येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन मंगळवारी भुसावळकडे जात होते. भंडारा शहरापासून ५ किमी अंतरावरील भिलेवाडा जवळील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या बोलेरो पीकअप वाहनाचे चाक पंक्चर झाले. चाक बदलविण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. चाक बदलवित असताना समोरुन आलेल्या भरधाव कारने या दोन्ही भावांना अक्षरश: चिरडत नेले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघाताची माहिती होताच कारधा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. दोन्ही भावांचे मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेत भंडारा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. मात्र या दोघांचीही सुरुवातीला ओळख पटली नव्हती. नंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्याजवळील कागदपत्रे आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरुन हे दोघे भुसावळ येथील राहणारे असून सख्खे भाऊ असल्याची माहिती पुढे आली. या अपघाताने काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Accidentअपघात