मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : सिंचनातून समृध्दीचे स्वप्न पाहत शेकडो शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे अर्ज दिले. साकोली उपविभागातील अडीच हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अडीच वर्षात एकाही शेतकऱ्याच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष खदखदत आहे.शासनाने वीज जोडणीचा अनुशेष दूर करण्यासाठी धडक योजना हाती घेतली आहे. साकोली उपविभागातील लाखनी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यातील सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे रितसर अर्ज जून २०१६ पूर्वी दाखल केले. मात्र अद्यापही त्यांना वीज जोडणी मिळाली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध केली आहे. परंत वीज जोडणी अभावी त्यांना सिंचन करुन हंगामात दोन पीक घेता येणे अशक्य झाले आहे.पालांदूर महावितरण कार्यालयांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांना ३१ महिन्यांपासून वीज जोडणी मिळाली नाही. डिमांड भरुन इतके दिवस लोटूनही महावितरणकडे शेतकऱ्यांना जोडणी देण्यास वेळ नाही. यापरिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बोअरवेल, विहिर खोदून पाण्याची व्यवस्था केली. परंतू पाण्याअभावी त्यांचे उत्पन्न वाढू शकत नाही. पालकमंत्र्यांनी याबाबत अनेकदा लेखी सुचना दिल्या आहेत. परंतु त्याचा फायदा शेतकºयांना झाला नाही.महावितरण कार्यालयाअंतर्गत साकोली विभागातील साकोली, लाखनी, लाखांदूर या तीन तालुक्यातील अडीच हजार शेतकरी डिमांड भरुन वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडे तर महावितरण कंपनीने डिमांड देणेच बंद केले. या सर्व प्रकारामुळे शेतकरी मेटाकूटीस आले आहे. वीज वितरण कार्यालयात शेतकºयांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात.शेतात वीज खांब मात्र जोडणी नाहीपालांदूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वीज खांब उभे आहेत. परंतू वीज कनेक्शन देणे बंद आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच आता वीज वितरण कंपनी एका शेतकऱ्याला एक रोहित्र देण्याचे धोरण आखत आहे. यातून केवळ कंत्राटदाराला फायदा होईल आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकरी आला रडकुंडीलाअनुसूचित जाती कोट्यातून डीपीसी अंतर्गत पालांदूर येथील शेतकरी महेश कोचे यांना जुन २०१७ मध्ये वीज कनेक्शन मंजूर झाले आहे. यासंदर्भात वारंवार महावितरण कार्यालयाचे उंबरठे झीजवून थकले आहे. अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वीज जोडणी मिळाली नसल्याने ते रडकुंडीला आले आहे.सिंचनासाठी सौर उर्जेवरील यंत्रणा देण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी शासन अनुदानही देणार आहेत.-अनिल गेडाम,कार्यकारी अभियंता, साकोली
अडीच हजार शेतकरी नवीन वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:03 IST
सिंचनातून समृध्दीचे स्वप्न पाहत शेकडो शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे अर्ज दिले. साकोली उपविभागातील अडीच हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अडीच वर्षात एकाही शेतकऱ्याच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष खदखदत आहे.
अडीच हजार शेतकरी नवीन वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
ठळक मुद्देसाकोली उपविभाग : अडीच वर्षात एकही जोडणी नाही