शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वीस वर्षांपासून २३ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:45 IST

तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले.

ठळक मुद्देगोबरवाही पाणीपुरवठा योजना : लोकार्पणानंतर केवळ तीन महिनेच मिळाले पाणी

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले. आता उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे.तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला २० वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली. या योजनेचे भूमिपूजन १९९८ मध्ये तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही योजना ३३ कोटी रूपयांची होती. आता या योजनेतून काम होवून बरीच वर्ष लोटली. परंतु गोबरवाही परिसरातील २३ गावांना अद्यापही पाणीपुरवठा झाला नाही. ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे.बावनथडी प्रकल्पाला जोडून गोबरवाही, पवनारखारी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला या परिसरातील आदिवासी बहुल गावांना पाणीपुरवठा केला जाणार होता. २० वर्षांचा मोठा कालखंड लोटूनही गावे तहाणलेलीच आहे. गतवर्षी लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र केवळ तीन महिनेच ही पाणीपुरवठा योजना सुरळीत राहिली. त्यानंतर ही योजना बंद पडली ती कायमची. येथे कंत्राटदार व शासनात आर्थिक व्यवहारात तफावत निर्माण झाल्याने पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहे. योजना पुर्णत्वात जावूनही गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. रात्री-बेरात्री महिलांना पाण्यासाठी जागावे लागते.गावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. हातपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यातच अद्यापही जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे जलस्त्रोत कधी वाढणार आणि मुबलक पाणी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ गावातील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणाºया या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते पंकज कारेमोरे यांनी केली आहे.नियोजनाचा अभाव२३ गावात भूमिगत जलवाहिनी, नळबांधणी, आलेसूर येथील जलशुद्धीकरण केंद्र, बावनथडी प्रकल्पात योजनेचे पंपहाऊस व इतर महत्वाची कामे करण्यात आली आहे. परंतु नियोजनाअभावी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यास अडचणी येत आहे. संबंधित विभागात नियोजनाचा अभाव दिसत असून याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई