शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

तुमसर-तिरोडा रेल्वे मार्ग असुरक्षित

By admin | Updated: July 20, 2015 00:26 IST

तुमसर तिरोडा रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जातो. सातपुडा पर्वत रांगेतील दगड फोडून रेल्वे मार्ग ब्रिटीशांनी तयार केला

भुयारी मार्गात पाण्याची साठवणूक : पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यतातुमसर : तुमसर तिरोडा रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जातो. सातपुडा पर्वत रांगेतील दगड फोडून रेल्वे मार्ग ब्रिटीशांनी तयार केला होता. पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चार वर्षापूर्वी एक मोठा दगड रेल्वे ट्रॅकवर पडला होता. चालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला होता. हे येथे उल्लेखनीय.तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान प्रवाशी गाड्या व मालवाहतूक गाड्या दररोज धावतात. ब्रिटीशकालीन हा रेल्वे मार्ग आहे. सातपुडा पर्वत रांगा व घनदाट जंगलातून हा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. मॅग्नीजची ने-आण करण्याकरिता हा रेल्वे मार्ग तयार केला होता. डोंगरी बु. बाळापूर गावाजवळ एका दगडी बोगदयातून रेल्वे मार्ग जातो. महाकाय दगड फोडून रेल्वे ट्रॅक येथे घालण्यात आला. पावसाळ्यात पाणी मुरुम भूसंखलनाचा मोठा धोका असतो. चार वर्षापूर्वी या रेल्वे ट्रॅकवर मोठा दगड पडला होता. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधाने तो अपघात टळला होता.हा रेल्वे मार्ग यामुळे असुरक्षित मानला जात आहे. रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दगडी बोगदा ६० ते ७० मीटर एवढा लांब आहे. वळणामय मार्ग असल्याने समोरचे दिसत नाही. रेल्वेच्या स्थापत्य विभागाने आधूनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कायम स्वरुपी सुरक्षित उपाय योजना करण्याची गरज आहे. या स्थळापासून शंभर मिटर अंतरावर फाटकाजवळ पायदळ भूयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. रेल्वे मार्गावर भूयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत तिथे पाणी साचण्याचा प्रकार सुरु आहे. अभियंत्यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)