शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शेतकऱ्यांना तुमसरच्या तहसीलदारांनी बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:56 IST

अनुदान परत करा : सुकळी नकुलच्या यादीत घोळ

रंजित चिंचखेडेलोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करण्यात आली. ही बाब गावातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार दिली. चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. शासन स्तरावरून दिले जाणारे अनुदान तत्काळ परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही नोटीस प्राप्त होताच शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. काही शेतकऱ्यांनी शासनाला निधी परत केल्याची माहिती देण्यात आली आहे.

गत सप्टेंबर महिन्यात पुराचे पाणी शिरले होते. महसूल विभागाने पूरग्रस्त शेती आणि धान पिकांचे सर्वेक्षण केले होते. राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत घोषित केली आहे. हेक्टरी आर्थिक मदत शेतकऱ्यांना डीबीटीअंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात येत आहे. ठसुकळी नकुल गावात पूरग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत प्रसिद्ध करण्यात आली नाही. ज्या शेतकऱ्यांचे शेत शिवारात दूरवर पुराचे पाणी पोहचले नाही. अशा शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध यादीत आहेत. याशिवाय ज्यांचे नावे शेती नाही, अशा शेतकऱ्यांना ४८ हजार ६०० रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

पती, पत्नी, सासू, सासरे यांना लागली लॉटरीएकाच कुटुंबातील पती, पत्नी, सासू आणि सासरे यांना प्रत्येकी ४८ हजार ६०० रुपयांची लॉटरी लागली आहे. हे शेतकरी गावातील शेतकरी नाहीत. मोठा घबाड करण्याचा प्रयत्न झाला आहे. ०.७७ आर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना लॉटरी लागली नाही, त्यांना मात्र फक्त आश्वासनांचे गाजर दाखविण्यात आले आहे. अशांना लाभ मिळणार की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

गावातील यादीत आहे ३० ते ४० लाखांचा घोळगावातील यादीत ३० ते ४० लाखांचा घोळ असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे तुमसर तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र तुरकर यांनी दिली होती. लेखी आणि तोंडी तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी चौकशी केली असता, धक्कादायक माहिती निदर्शनास आली. पूरग्रस्तांच्या यादीत गडबड असल्याचे दिसून आले आहे. अर्धेपेक्षा अधिक बोगस शेतकरी असल्याचे निदर्शनास आले आहे.

बाहेर गावातील शेतकऱ्यांना अनुदानसुकळी नकुल गावाच्या पूरग्रस्त यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे आली आहेत. त्यांच्या खात्यात अनुदान वळते करण्यात आले आहेत. ही नावे आली असल्याने संशय बळावला आहे. या शेतकऱ्यांना अनुदान परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुकळी नकुल येथील वंचित शेतकऱ्यांनी केली आहे.

५ मार्चला अशा बोगस शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहेसुरूवातीच्या काळातच परफेक्ट यादी तयार करण्यात आली असती तर आज ही वेळ उदभवली नसती, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

"माझी शेती नदीच्या पात्राच्या लगत आहे. गावाच्या दिशेने पुराची सुरुवात माझ्याच शेतीतून होते. संपूर्ण धानाचे पीक पुरात सडले होते, परंतु मदत तोडकी देण्यात आली आहे. नदीपासून ३०० मिटर अंतरावर पूर शिरले नसताना बोगस शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. दोषींवर कारवाई अन् वंचितांना न्याय मिळाले पाहिजे."- महेंद्र पारधी, नुकसानग्रस्त शेतकरी, सुकळी-नकुल.

टॅग्स :bhandara-acभंडाराtumsar-acतुमसर