शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

तुमसर रोड रेल्वे स्थानकात मातीचे ढिगारे, साहित्य पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:56 IST

तुमसर रोड रेल्वे स्थानकात 'फुट वे ब्रीज'चे बांधकाम कासवगतीने सुरु आहे. मागील महिनाभरापासून प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच वर उंच मातीचे ढिगारे व लोखंडी साहित्य पडून आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वरील छत मागील महिन्याभरापूर्वी काढण्यात आले. भर उन्हात येथे रेल्वे प्रवाशांना उभे राहावे लागत आहे.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकातील छत काढले। हजारो रेल्वे प्रवाशांना फटका, फुट वे ब्रिजचे काम संथगतीने

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकात 'फुट वे ब्रीज'चे बांधकाम कासवगतीने सुरु आहे. मागील महिनाभरापासून प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच वर उंच मातीचे ढिगारे व लोखंडी साहित्य पडून आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वरील छत मागील महिन्याभरापूर्वी काढण्यात आले. भर उन्हात येथे रेल्वे प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. साहित्य व मातीच्या ढिगाºयामुळे रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.दक्षिण पूर्व रेल्वेचे तुमसर रोड जंक्शन नागपूर विभागात महसूल मिळवून देणारे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो प्रवाशी ये जा करतात. येथे रेल्वे स्थानकावर जुना फुट वे ब्रीज आहे. त्याच्या शेजारी नवीन फुट वे ब्रीजचे बांधकाम रेल्वे प्रशासनाने सुमारे एक महिन्यापूर्वी हाती घेतले. याकरिता प्लॅटफार्म क्रमांक दोन व तीनवरील छत काढण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वेगाडीची भर उन्हात प्रतीक्षा करावी लागत आहे.प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच वर महाकाय मातीचे ढिगारे करून ठेवले आहेत. लोखंडी, लाकडी साहित्य अस्तव्यस्त पडून आहेत. मातीचा ढिगारा खचून येथे धोक्याची अधिक शक्यता आहे. फुटवे ब्रीजचे काम कागसवगतीने सुरु आहे. पाऊस पडल्यावर संपूर्ण माती रेल्वे स्थानकात व रेल्वे ट्रॅकवर वाहून जाण्याची भीती आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवाशी ये जा करतात. स्थानकात मातीचे ढिगारे व साहित्य अस्तव्यस्त पडून आहेत. प्रवाशांच्या जीवाला येथे धोका निर्माण झाला आहे. स्थानकातील छत काढण्यात आले. त्या ठिकाणी पर्यायी हिरवे नेट लावण्याची गरज होती. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.- सुधाकर कारेमोरे,उपजिल्हा प्रमुख, शिवसेना, तुमसररेल्वे प्रशासनाला पडला विसरमातीचे ढिगारे अत्यंत उंच असून पलीकडचे येथे काहीच दिसत नाही. रेल्वेचा स्थापत्य अभियंत्याच्या निरीक्षणाखाली सदर बांधकाम सुरु आहे. किमान पावसाळ्यापूर्वी अधिक वेगात ही कामे पूर्ण करण्याची गरज आहे. सदर रेल्वे मार्गावरून अनेक वरिष्ठ अधिकारी ये-जा करतात. परंतु त्याबाबत कारवाई येथे शून्य दिसत आहे. सार्वजनिक तथा वर्दळीच्या स्थळी साहित्य पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. याचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे