लोकमत न्यूज नेटवर्कतुुमसर : तालुक्यातील क्रमांक एकचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या तुमसर नाकाडोंगरी राज्यमार्गावर सुंदरटोला गाव शिवारात व परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्याचे पूर्णत: विद्रुपीकरण झाले आहे. परिणामी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून किरकोळ अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मध्यप्रदेश व महाराष्ट्रला जोडणारा राज्यमार्ग हा अख्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात महत्वाचा डांबरी रस्ता १५ वर्षापूर्वी करण्यात आला होता. रस्त्यावर ना खड्डे पडले ना ही तो उखडला गेला होता. त्यामुळे या मार्गाची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमत धोरणामुळे त्या रस्त्यावर गरज नसतानाही डांबराचा मुलामा चढविण्यात आला. या आंतरराज्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात.हा मार्ग वर्दळीचा आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच रस्ता उखडला गेला व पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच किरकोळ अपघाताच्या घटनादेखील वाढल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. प्रशासन या मार्गावर मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. बांधकाम विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अपघातात वाढतालुक्यातील सर्वात सुंदर अशा रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. वाहनांच्या नुकसानीबरोबरच नागरिकांच्या अपघाताची संख्येत वाढ झाली आहे. आता तरी प्रशासनाने गंभीर अपघाताची वाट न पाहता रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा जनक्षोभाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही.
तुमसर-नाकाडोंगरी राज्यमार्गाचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST
मध्यप्रदेश व महाराष्ट्रला जोडणारा राज्यमार्ग हा अख्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात महत्वाचा डांबरी रस्ता १५ वर्षापूर्वी करण्यात आला होता. रस्त्यावर ना खड्डे पडले ना ही तो उखडला गेला होता. त्यामुळे या मार्गाची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमत धोरणामुळे त्या रस्त्यावर गरज नसतानाही डांबराचा मुलामा चढविण्यात आला.
तुमसर-नाकाडोंगरी राज्यमार्गाचे हाल
ठळक मुद्देअपघाताच्या घटनेत वाढ : जनक्षोभाचा भडका उडणार