शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर -मोहाडी क्षेत्राच्या विकासासाठी कटीबध्द

By admin | Updated: November 6, 2014 01:02 IST

मोहाडी - तुमसर क्षेत्राच्या सर्वांगिण विकास व जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे.

वरठी : मोहाडी - तुमसर क्षेत्राच्या सर्वांगिण विकास व जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास संकल्पना शासन दरबारी मांडल्या. पण विधानभवनातून सकारात्मक यश आले नाही. आता जनतेनी थेट विधानसभेवर पाठविल्यामुळे मी अनुभवलेल्या व अभ्यास केलेल्या विकासात्मक संकल्पना थेट मांडता येतील व हक्काने मंजुर करवून आणता येतील. राजकारणात अनेक शंका - कुशंका असतात. पण मी त्यांना मानत नाही. क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी राजकारण आडवे येणार नाही. या क्षेत्रातील समस्या सोडवण्यास मी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी दिले.कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरच्या वतीने वरठी येथील शासकीय गोदामात व्यापारी व राशन दुकानदार यांच्याकरिता भौतिक सुविधा म्हणून थंड पाण्याचे यंत्र, शौचालय व बैठक व्यवस्था करण्यात आली. या सुविधाचे लोकार्पण आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, तहसीलदार कल्याण डहाट, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप टाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती राजकुमार माटे, सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलींद रामटेके, राशन दुकानदार संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ओमप्रकाश थानथराटे, रामदयाल पारधी, मनोहर कहालकर, हरीशंकर समरीत, युवराज आगासे, सुनिल गिऱ्हेपुंजे, दिवांजी पटले, विनोद बुराडे, राजु गायधने, विरेंद्र रंगारी, रवि येळणे, रामराव कारेमोरे, दादुमल राणे, सुभाष भोंगाडे उपस्थित होते.नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे यांचा कृषि उत्पन्न बाजार समिती, स्वस्त धान्य डीलर संघ मोहाडी - तुमसर, ग्राम पंचायत कार्यालय वरठी, परमात्मा एक सेवक मंडळ वरठी, जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाजार समितीच्या वतीने सभापती भाऊराव तुमसरे, स्वस्त धान्य डीलर संघाच्या वतीने अरविंद कारेमोरे, ग्राम पंचायतच्या वतीने सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलींद रामटेके, रविंद्र बोरकर, संगिता सुखानी, शशिकला चोपकर, मनिषा मडामे, नंदा सिरसाम, चांगदेव रघुते व जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने श्रावण मते, विष्णुपंत चोपकर, रवि डेकाटे यांनी सत्कार केला.संचालन व प्रास्ताविक स्वस्त धान्य डीलर्स संघाचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे व आभार तथागत मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजकुमार गोसेवाडे, सहसचिव अनिल भोयर, मिनाक्षी घरडे, ग्यानीराम साखरवाडे, विरेंद्र देशमुख, परमानंद बन्सोड, बानु बोबडे, राधेशाम पडोळे, सिध्दार्थ रामटेके, भाजपचे सैनिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मिलींद धारगावे, सुरजभान चव्हान, धनलाल मेश्राम, घनशाम बोंदरे, गंगाधर पंचभाई, उपस्थित होते. (वार्ताहर)