शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

धान खरेदी योजनेची तुघलकी व्यवस्था

By admin | Updated: May 19, 2016 00:28 IST

उन्हाळी भातासाठी आधारभूत धान खरेदी योजनेतील तुघलकी व्यवस्थेमुळे संपूर्ण तालुक्यातील उन्हाळी धान ....

नियोजनाचा अभाव : शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था, केंद्रांसमोर धानाची आवक वाढलीसाकोली : उन्हाळी भातासाठी आधारभूत धान खरेदी योजनेतील तुघलकी व्यवस्थेमुळे संपूर्ण तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केंद्रे सुरू केले आहे. दोन दिवसांनी कोणत्या गावाचे धान कोणत्या केंद्रावर घेण्यात येईल, याचा घोळ निर्माण केल्याने पुर्वीच सुविधा असलेल्या केंद्रावर धान आणलेल्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती बळावली आहे. रेल्वेत ऐन वेळेवर प्लेटफॉर्म बदलल्यावर प्रवाशांची जशी अवस्था होते, तशी अवस्था सध्या खरेदी केंद्रावर धान आणून ठेवलेल्या शेतकऱ्यांची झाली आहे. १६ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी गावनिहाय खरेदी केंद्राची यादी जाहीर केली, हे येथे उल्लेखनीय आहे. या नव्या व्यवस्थेमुळे केंद्रावर आठ-दहा दिवसांपासून धान आणून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आपल्या केंद्रावर धान नेण्यासाठी मोठा प्राणायोग करावा लागणार आहे.१५ मे पासून तालुक्यात केंद्राव्यतिरिक्त पळसगाव व सुकळी अशा १० केंद्रे सुरू केली. त्याआधीच्या शेतकऱ्यांनीे धान सोयीच्या केंद्रावर लवकर नंबर लागवा म्हणून नियोजित तारखेच्या चार-पाच दिवसापासून आणून ठेवले. परंतु जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दोन दिवसानंतर गावनिहाय खरेदी केंद्राची यादी जाहीर केली. त्यामुळे आपल्या सोयी प्रमाणे धान केंद्रावर आधीच नेवून ठेवलेल्या काही शेतकऱ्यांचे गावनिहाय प्रमाणे केंद्र नसल्याने तेथून धान उचलून आपल्या नियोजित केंद्रावर धान देण्यास मोठी कसरत करावी लागेल. (तालुका प्रतिनिधी) गोदामाचा लहान आकार, अव्यवस्थासावरबंद, एकोडी, परसोडी, सुकळी, सातलवाडा येथील धान साठवणुकीचे गोडावून लहान आहेत. त्यामुळे येथील गोडावूनची क्षमता पूर्ण झाल्यावर खरेदी न झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा आपला माल दुसऱ्या केंद्रावर न्यावे लागेल. त्याचाही भुर्दंड शेतकऱ्यांना बसेल. आज घटकेस साकोली, विर्सी, सानगडी, पळसगाव येथे गोडावून मोठे असले तरी आजमितीस या खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान मैदानावर आणून ठेवले आहेत. या व्यतिरिक्त साकोली विर्सी सानगडी येथे शेकडो ट्रॅक्टरर्समध्ये धान भरून रांगेने उभे आहेत. वरीलपैकी सुकळी, निलज, सावरबंद व सातलवाडा येथे काही सुविधांअभावी ही केंद्रे बातमी लिहीपर्यंत सुरू होऊ शकली नाहीत. तर काही मोठ्या केंद्रावर हमालांच्या तुटवड्यामुळे धान मोजणीचा वेग मंदावला आहे.येत्या काही दिवसात धान शेतकऱ्यांचा पावसाळी हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी धान लवकर मोजनू व्हावा या प्रयत्नात आहे. त्यातच जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या तुघलकी निर्णयामुळे शेतकरी भांबावून गेला आहे. बाजार समिती लाखनी, जिल्हाधिकारी भंडारा, आमदार बाळा काशीवार, खरेदी एजेंट व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देवून जो माल सध्या ज्या खरेदी केंद्रावर आहे तेथेच मोजण्याची पूर्वीप्रमाणे व्यवस्था करावी, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा महामंत्री व बाजार समिती संचालक अ‍ॅड. मनिष कापगते यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनीही या संबंधाचे निवेदन तहसीसलदारांना दिले आहे.