तथागत मेश्राम - वरठीभंडारा रोड रेल्वेस्थानकाची अवस्था भंगार प्रमाणे आहे. पण या रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ शोरूममध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे दिसणारे तिकीट तपासणीक सध्या चर्चेत आहेत. रेल्वेस्थानकावर फिरणाऱ्या टपोरीप्रमाणे त्याची दिसणारी वेशभुषा व प्रवाशासोबतची त्यांची असभ्य वागणूक मानहानीकारक ठरत आहे. तिकीट मागण्याची दबंग स्टाईल, बोलीभाषा विचित्र असून प्रवाशावर हात उगारण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्या अशा वागण्याकडे रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे त्याची हिंमत वाढली आहे. असेच प्रकार सुरू राहले तर लवकरच फिल्मी रंगत होणार याची चर्चा गावात सुरू आहे.रेल्वे स्थानकावरून प्रवास करणारे तसेच प्रवास संपवून उतरणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे काम त्यांच्याकडे आहे. पण त्यांचा विचित्र स्वभाव प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. तिकीट तपासणीक कमी व टपोरी जास्त दिसते. त्याचे स्टाईलीस पँट, शर्टचे उभे कॉलर व हावभाव तिकीट तपासनिक म्हणून शोभणारे नाही.तिकीट तपासणी करताना त्याची स्टाईल कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या मानहानी सारखी वाटते. तिकीट मागताना धाक दाखवणे, जोरात बोलणे व वेळोवेळी प्रवाशाचे कॉलर पकडण्याचे प्रकार चर्चेत आहेत. रेल्वे स्थानकावर तरूणांना तो टारगेट करतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अकारण अडवून ठेवतो. तपासणीच्या नावावर चौकशीमध्ये तासनतास विद्यार्थ्यांना बसवून ठेवल्या जाते. पैसे घेतल्याशिवाय त्यांना सोडत नाही. वेळेप्रसंगी तो प्रवाशावर हात उगारतो. अकारण वेळीस घरून प्रवाशांना घरी फोन करून पैसे मागवण्यास सांगतो.रेल्वेस्थानकावर तिकीट तपासणे हा त्यांचा काम आहे. पण त्यांच्या अरेरावीमुळे प्रवाशी त्रासले आहेत. उड्डाणपुल नसल्यामुळे गावातील शेकडो मुले-मुली रेल्वे स्थानकावरून ये-जा करतात. याचा नेमका फायदा घेत महाविद्यालय सुटण्याच्या वेळेवर तो जास्ती स्टाईलीस होतो. तावातावात ओबर एक्टींगच्या भानगडीत गावातील प्रतिष्ठीत नागरिकांना पकडतो व जबरन चालान करतो. यात मुलींचा समावेश असतो. सध्या रेल्वेस्थानकावर त्याची दबंगगिरी चर्चेत आहे. त्यांच्या विचित्र स्वभावामुळे प्रवाशांना मात्र त्रास होत आहे. भंडारा रोड रेल्वे स्टेशनवरील विना तिकीट प्रवाशांना पकडण्याचे काम तिकीट तपासणीकाचे आहे. रेल्वे स्टेशन परिसरात उतरणारे प्रवासी यांच्यासह या भागात वावरणाऱ्या प्रवाशाकडून तिकीट तपासणे त्यांची जबाबदारी आहे. पण दिवसभर रेल्वेस्टेशनवर फिरणारे खिसेकापू चोर यांना तो हटकत नाही. गुंड, बदमाश दिसले की तो पळून जातो. तिकीट तपासणीच्या नावावर फक्त सामान्य प्रवाशांना पकडतो. गावातील लोकांना व प्रवाशांना सोडायला आलेल्याना टार्गेट करून हकनाक त्रास देतो. या रेल्वेस्थानकावर दिवसभर चोर व खिसेकापू फिरत असतात त्यांना कोणीही मज्जाव करीत नाही.
रेल्वेस्थानकावर ‘टीटीई’ची दबंगगिरी
By admin | Updated: February 9, 2015 23:08 IST