शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:34 IST

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या बारीक वाणांची निवड करुन आपल्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन भंडाराचे उपविभागीय कृषि अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.

ठळक मुद्दे मिलिंद लाड : भंडारा येथे खरीप हंगाम आढावा बैठक, नियोजन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या बारीक वाणांची निवड करुन आपल्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन भंडाराचे उपविभागीय कृषि अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.पंचायत समिती सभागृह, भंडारा येथे सन २०१९- २० वर्षाकरीता आयोजित खरीप हंगाम आढावा सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी अधिकारी संतोष डाबरे, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी विस्तार अधिकारी लांजेवार, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, कृषी अधिकारी पिसे, शहारे, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मिलींद लाड म्हणाले, जिल्ह्यात पावसाची अनियमितता, कीड रोगांच्या प्रादुर्भावानुसार वाढलेली महागाई लक्षात घेता खरिप हंगामामध्ये कृषी विकास यंत्रणेने बारीक भात वाणाची म्हणजेच १२० ते १२५ दिवसात येणाºया वाणाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केल्यास शेतकऱ्यांचा उत्पादनावरील खर्च कमी होवून शेतकºयांची आर्थिक उन्नती होईल, असे सांगितले.कार्यक्रमाचे उद्घाटक भंडारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, संतोष डाबरे म्हणाले, कृषीसेवा केंद्रधारक हा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दूवा असून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याचे काम कृषी सेवा केंद्र धारकांचे आहे.त्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करुन चांगल्या प्रतीचे गुणवत्तापूर्ण निविदा शेतकऱ्यांना पुरवठा करा, फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.भंडारा तालुका कृषि अधिकारी, अविनाश कोटांगले यांनी आपल्या प्रमुख उपस्थितीत कृषी सेवाकेंद्र धारकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांंचा पुरवठा व्हावा यासाठी गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक तयार केले आहे. या पथकाच्या विविध ठिकाणी अचानक भेटी होणार असून शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले.पवनी पंंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी लांजेवार, भंडारा पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी शहारे, कृषी अधिकारी पिसे, तालुका कृषी अधिकारी झोडपे, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, पहेलाचे पर्यवेक्षक होमराज धांडे, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृषी यंत्रणा खरीप हंगामास सज्जकमी कालावधीचे म्हणजेच १२० ते १२५ दिवसांच्या कालावधीत अधिक उत्पादन देणाºया वाणांची मार्गदर्शिका कृषी विभागाने तयार केली आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावपातळीवर शेतकऱ्यांना २५ मे पासून खरीप सभेद्वारे कमी कालावधीतील जास्त उत्पादन देणाऱ्या भाताच्या वाणांबद्दल जनजागृतीच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षीत केले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी दिली. कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करुन प्रशिक्षणाला येणे बंधनकारक असल्याच्या सूचना त्यांनी उपस्थित कर्मचाºयांना दिल्या.गावनिहाय शेतीशाळाप्रशिक्षीत कर्मचाऱ्यांमार्फत गावतपाळीवर होणाऱ्या खरीपातील शेतीशाळा हे कृषी विस्तारांचे, शेतकऱ्यांच्या प्रगतीसोबतच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नवाढीसाठी , जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया तालुका अधिकारी अविनाश कोटांगले यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेती