शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

योगाप्रति जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 01:26 IST

निरामय आयुष्यासाठी योगा हे रामबान औषध आहे. त्यासाठीच योगाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी भंडारा शहरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय योग दिन : शिबिरात २८ योग व प्राणायमांचा अभ्यास, शेकडो नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निरामय आयुष्यासाठी योगा हे रामबान औषध आहे. त्यासाठीच योगाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी भंडारा शहरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, जे.एम. पटले महाविद्यालय, पतंजलि योग समिती, आय.एन.ओ., जिल्हा आरोग्य संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिनाच सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, भारत स्वाभीमान नॅसचे जिल्हा प्रभारी रामविलास सारडा, पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर, आय.एम.ओ. समावेक डॉ. भगवान मस्के, डॉ. कार्तिक पनीकर, डॉ. राजेंद्र शहा, डॉ. भीमराव पवार, डॉ. प्रशांत माणूसमारे, प्रा. रूपमेश मोहतुरे आणि जिल्हाधिकाऱ्यांचा परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला रोपटे देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. रमेश खोब्रागडे, कांचन ठाकरे, स्रेहल तिडके, भोजराज झंझाळ यांनी योगाच ेप्रात्यक्षिक सादर केले. जिल्हाधिकारी शांतनू गोलय यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात ग्रिना, चालन, स्कंध चालन, स्कंद चक्र, कटी चालान, खुटना संचालन, ताडसन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोनासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, मरीचासन, भुजंगासन, सेतुबंधासन, उत्तानपादासन, अर्धहस्तासन, पवनमुक्तासन, श्वासन, अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी प्राणायाम, शितली प्राणायाम आदींचा अभ्यास करण्यात आला. संत शिवराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगावर आधारित गीत सादर केले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्रीडा विभागांतर्गत जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुल लाखांदूर, लाखनी, साकोली, पवनी, तुमसर व मोहाडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरस्कोल्हे यांनी मानले. यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी महेश पडोळे, भोजराज चौधरी, मंगेश कुडवे आदींनी सहकार्य केले.रुग्णालयात योगाआयुषू विभाग व राष्ट्रीय अभियानाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. सुनिता बडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Yogaयोग